तेलही गेलं तूपही गेलं! पार्थ चॅटर्जींना एकाच दिवसात डबल धक्का, ममता बॅनर्जींची कडक कारवाई
ममता बॅनर्जींच्या सरकारने पार्थ चॅटर्जीवर मोठी कारवाई केली आहे. दुपारी त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. तर सायंकाळी त्यांची टीएमसी पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. पार्थ चॅटर्जींचे नाव पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात आले आहेत. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. शिक्षणमंत्री असताना त्यांना घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘पार्थ […]
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जींच्या सरकारने पार्थ चॅटर्जीवर मोठी कारवाई केली आहे. दुपारी त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. तर सायंकाळी त्यांची टीएमसी पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. पार्थ चॅटर्जींचे नाव पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात आले आहेत. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. शिक्षणमंत्री असताना त्यांना घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘पार्थ चॅटर्जी यांना टीएमसीमधून बाहेर काढण्यात आले आहे. सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्षांसह उर्वरित तीन पदांवरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषी आढळले नाही तर ते पुन्हा पक्षात परततील.”
Partha Chatterjee has been removed from TMC along with the post of General Secretary, National vice president & three other posts. He has been suspended till the investigation is underway. He can come back if proven not guilty: TMC leader Abhishek Banerjee pic.twitter.com/lxadGt5OHN
— ANI (@ANI) July 28, 2022
यापूर्वी बंगालच्या मुख्य सचिवांनी हा आदेश जारी केला होता. पार्थ चॅटर्जी यांना उद्योगमंत्री पदावरून हटवण्यासोबतच त्यांना अन्य पदांवरूनही हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण विभाग, संसदीय कामकाज इत्यादी विभागातूनही काढण्यात आले होते.
हे वाचलं का?
पार्थ चॅटर्जींची सहकारी अर्पिता मुखर्जींच्या घरावरही छापा
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जींना ईडीने अटक केली आहे. अर्पिता मुखर्जींना पकडल्यानंतर पार्थ यांना अटक करण्यात आली होती. अर्पिताच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड सापडली होती.
यानंतर बुधवारी अर्पिताच्या दुसऱ्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यातही सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड सापडली. यासोबतच तेथून अनेक किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात लाच म्हणून घेतलेला हाच पैसा असल्याचे ईडीचे मत आहे.
ADVERTISEMENT
आतापर्यंत सापडली 50 कोटींची रोकड
गेल्या वेळी 21 कोटी 90 लाख मिळाले होते, तर यावेळी ईडीला 27 कोटी 90 लाख रुपये कॅश आणि 4 कोटींहून अधिक किमतीचे सोने मिळाले आहे. काल 21 जुलै रोजी ईडीने डायमंड सिटी फ्लॅटवर छापा टाकला होता, तर बेलघोरिया यांच्या फ्लॅटमध्ये छापेमारी करताना कॅश सापडली होती.
ADVERTISEMENT
छाप्यात काय सापडले?
– 27 कोटी 90 लाख रोख
– 6 किलो सोने (6 अर्धा किलो सोन्याच्या बांगड्या, 3 किलो सोन्याची बिस्किटे)
– सोन्याचे पेन
बेडरुम, टॉयलेटमध्ये सापडल्या नोटा
या फ्लॅटमध्ये पैसे कुठे ठेवले होते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नोटा बेडरूममध्ये, ड्रॉईंग रूममध्ये आणि टॉयलेटमध्ये सापडल्या आहेत. वॉशरूमच्या बेसिनखाली एक लॉकर बनवले होते त्यातही काळ्या पैसा लपवण्यात आला होता.
बुधवारी ईडीने छापा टाकला तेव्हा नोटा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनाच धक्का बसला होता. रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. नोटा मोजण्यासाठी मशिन मागवण्यात आली होती. ट्रकमध्ये 20 पेट्या मागवण्यात आल्या होत्या. सकाळी 4 वाजता पैशांची मोजणी संपली तेव्हा ही रक्कम 27 कोटी 90 लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर हे पैसे ट्रकमध्ये भरून पाठण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT