अवघ्या 10 मिनिटांत ड्रोनने पोहोचवली लस! महाराष्ट्रातील पहिला प्रयोग ठरला यशस्वी
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सगळीकडे नागरिकांचं लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून राज्यात सक्तीबरोबरच विविध उपक्रमही राबवले जात आहेत. आरोग्य यंत्रणांकडून लोकांच्या लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. अनेक अतिदुर्गम गाव-खेड्यांमध्ये लस पोहोचवण्यात अडथळे येत असून महाराष्ट्राने या अडथळ्यांवरही मात केली आहे. दुर्गम ते अतिदुर्गम भागात ड्रोनच्या मदतीने लशी पाठवण्याच्या […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सगळीकडे नागरिकांचं लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून राज्यात सक्तीबरोबरच विविध उपक्रमही राबवले जात आहेत. आरोग्य यंत्रणांकडून लोकांच्या लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. अनेक अतिदुर्गम गाव-खेड्यांमध्ये लस पोहोचवण्यात अडथळे येत असून महाराष्ट्राने या अडथळ्यांवरही मात केली आहे. दुर्गम ते अतिदुर्गम भागात ड्रोनच्या मदतीने लशी पाठवण्याच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे.
ADVERTISEMENT
पालघरमधील जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात दळवळणाच्या सुविधा फारशा नाहीत. त्यामुळे या भागात कोरोना लस पोहोचवण्यासाठी अनंत अडचणींचा सामना आरोग्य यंत्रणेला करावा लागत होता. यातून मार्ग काढण्याचं आरोग्य विभागाने मनावर घेतलं आणि वाट सापडली.
हे वाचलं का?
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ब्ल्यू इन्फिनिटी आणि आयएफएल फाउंडेशन यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग 17 डिसेंबर यशस्वीरित्या पार पडला. जव्हार-मोखाडासारख्या डोंगर भागात लस पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या यावर मात करण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली असून, लस ड्रोनच्या मदतीने गावापर्यंत पोहचवली जाणार आहे.
ADVERTISEMENT
जव्हारमधील झाप येथे आज लसीचे 300 डोस ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले. या ड्रोनची पंचवीस किलोमीटरपर्यंत पाच किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता. यावेळी राज्याचे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांसह आयुक्त तसेच जिल्हाधिकारी माणिक गुरसळ उपस्थित होते.
ADVERTISEMENT
‘जव्हार ते झाप या दोन्हीमधील अंतर 17 किलोमीटर असून, राजीव गांधी मैदानातून ड्रोनने 2:45 वाजता झापच्या दिशेने भरारी घेतली. झाप आरोग्य केंद्राकडे 300 डोस घेऊन निघालेला ड्रोन 2:55 मिनि्टांनी अपेक्षित ठिकाणी पोहोचलं. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. दहा मिनिटांत हा ड्रोन लसी घेऊन आरोग्य केंद्रात दाखल झाला.
शितसाखळी अबाधित राखाणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत ही प्रमुख उद्दिष्ट या उपक्रमाची आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव पाठविणे सहज शक्य होईल, असा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT