अदाणींमुळे एलआयसीला बसला झटका! 50,000 कोटींचं नुकसान!

मुंबई तक

हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये घट होत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये बुडाले आहे. त्याचवेळी अदाणींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून LIC लाही प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. अवघ्या 50 दिवसांत देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला 50,000 कोटी रुपयांहून अधिक तोटा झाला आहे. अदाणींच्या कंपन्यांमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

दिवसेंदिवस अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये घट होत आहे. यामुळे कोट्यवधी रुपये बुडाले आहे.

त्याचवेळी अदाणींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून LIC लाही प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे.

अवघ्या 50 दिवसांत देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला 50,000 कोटी रुपयांहून अधिक तोटा झाला आहे.

अदाणींच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करणाऱ्या एलआयसीच्या गुंतवणूक मूल्यात मोठी घसरण झाली आहे.

आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2022 रोजी विमा कंपनीचे गुंतवणूक मूल्य 82,970 कोटी रुपये होते.

23 फेब्रुवारी 2023 पर्यंत ते 33,242 कोटी रुपये राहिले, म्हणजे एलआयसीला 49,728 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे गेल्या एक महिन्यात गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेली घट हे त्याचे प्रमुख कारण आहे.

24 जानेवारीपासून अदानीचे शेअर्स 30 टक्क्यांवरून 85 टक्क्यांवर घसरले आहेत. मार्केट कॅपमध्ये 12 लाख कोटी रुपयांची घट झाली.

अदाणी यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलरवरून ३५.३ अब्ज डॉलरवर आली असून, श्रीमंतांच्या यादीत ते ३३ व्या क्रमांकावर पोहोचलेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp