पाकिस्तानी चित्रपटात काम करणार; त्या वादग्रस्त वक्तव्यावर रणबीरचं स्पष्टीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ranbir kapoor controversial Statement: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) सध्या चर्चेत आहे. मागील वक्तव्यामुळे रणबीर सोशल मीडिया (Social Media) यूजर्सच्या निशाण्यावर आहे. रणबीरने डिसेंबर 2022 मध्ये (Red C Festival ) रेड सी फेस्टिव्हलमध्ये पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत सांगितले होते. यावरून ते वादात (Controversy ) सापडला आहे . आता रणबीर कपूरने त्याच्या (New Movie) नवीन चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’च्या (Tu Jhuti main Makkar) प्रमोशनदरम्यान आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. Ranbir kapoor give clarification on his statement

केसरीयाँ तेरा इश्क है पिया! अशी आहे रणबीर आलियाची लव्हस्टोरी

त्यामुळे रणबीर वादात सापडला आहे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये रणबीर कपूरला एका पाकिस्तानी चित्रपट निर्मात्याने विचारले की पाकिस्तानी चित्रपट इतरत्र सेट केल्यास तो काम करेल का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले, ‘नक्कीच सर. मला वाटतं कलाकारांना, विशेषत: कलेसाठी सीमा नसतात. मला काम करायला नक्कीच आवडेल. रणबीरच्या या वक्तव्यावर बरीच टीका होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रणबीरचं स्पष्टीकरण

अलीकडेच रणबीर त्याच्या नवीन चित्रपट ‘तू झुठी में मक्कर’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचला होता. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला. तो म्हणाला, ‘माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी एका चित्रपट कार्यक्रमाला गेलो होतो आणि अनेक पाकिस्तानी चित्रपट निर्माते मला प्रश्न विचारत होते, ‘जर तुझ्याकडे विषय चांगला असेल तर तू कोणता चित्रपट करणार?’ मला कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान टाळायचे होते. एवढा मोठा वाद झाला असेल असे मला वाटत नाही. माझ्यासाठी चित्रपट म्हणजे चित्रपट आणि कला ही कला.

तो पुढे म्हणाला, ‘ए दिल है मुश्किलमध्ये मी फवाद (खान)सोबत काम केले आहे. राहत (फतेह अली खान) आणि आतिफ अस्लम हे उत्तम गायक आहेत आणि त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे. त्यामुळे सिनेमा हा सिनेमा असतो. मला वाटत नाही की सिनेमा सीमा पाहतो. पण कलेचा आदर नक्कीच केला पाहिजे, पण कला ही आपल्या देशापेक्षा मोठी नाही. म्हणूनच ज्या देशाशी आपल्या देशाचे संबंध चांगले नाहीत, त्यावेळी स्वतःच्या देशाला तुमची पहिली प्राथमिकता नक्कीच असेल, असं रणबीर म्हणाला.

ADVERTISEMENT

Ranbir Kapoor ने खरंच चाहत्याचा मोबाईल फेकला का? बघा सत्य काय?

ADVERTISEMENT

रणबीर कपूर शेवटचा दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसला होता. आता तो दिग्दर्शक लव रंजन यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT