शौचालयात सापडली 50 लाखांची कॅश, सफाई कर्मचाऱ्याने दाखवला खरेपणा अन्…
स्वच्छतागृहाच्या डस्टबिनमधून सफाई कामगाराला 50 लाख रुपये सापडले. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही प्रामाणिकपणा दाखवत त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. चामिंदु अमरसिंघे (सफाई कामगार) हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका टीव्ही कंपनीच्या इमारतीत साफसफाईचे काम करायचे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर, बराच काळ 50 लाख रुपयांचा दावा करणारा कोणीही सापडला नाही. एका वृद्ध व्यक्तीने या पैशावर आपला हक्क व्यक्त […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
स्वच्छतागृहाच्या डस्टबिनमधून सफाई कामगाराला 50 लाख रुपये सापडले.
हे वाचलं का?
आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही प्रामाणिकपणा दाखवत त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
ADVERTISEMENT
चामिंदु अमरसिंघे (सफाई कामगार) हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका टीव्ही कंपनीच्या इमारतीत साफसफाईचे काम करायचे.
ADVERTISEMENT
पोलिसांना माहिती दिल्यानंतर, बराच काळ 50 लाख रुपयांचा दावा करणारा कोणीही सापडला नाही.
एका वृद्ध व्यक्तीने या पैशावर आपला हक्क व्यक्त केला. मात्र पैसे कुठून आले हे त्याला सिद्ध करता आलं नाही.
पुढे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने चामिंदूला 40 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले.
उर्वरित रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
चमिंदूचा प्रामाणिकपणा पाहता, एवढी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. यामुळे चमिंदूचा आनंद गगनात मावेनासा झाला.
चामिंदू म्हणाला, ‘आता मी माझे आयुष्य आरामात जगू शकतो.’ सध्या तो चांगल्या नोकरीच्या शोधात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT