नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात, ईडीने दाखल केली चार्जशीट

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. दाऊदच्या बहिणीशी म्हणजेच हसीना पारकरशी जमिनीसंदर्भातला व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा अद्याप मिळालेला नाही. अशातच त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…. काय म्हणाले शरद पवार?

ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली होती. गेल्या ५८ दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. २२ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अर्थातच नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

हे वाचलं का?

क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात!

नवाब मलिक यांच्यावर काय आहेत आरोप?

ADVERTISEMENT

कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. ही जागा मुनिरा प्लंबर यांची होती. मुनिरा यांनी आपली जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत मिळून ही जागा हडपली. याच प्रकरणात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले. त्यानंतर टेरर फंडिंगही त्यांनी केलं आहे का? असेही आरोप करण्यात आले आहेत. हे दोन मुख्य आरोप त्यांच्यावर आहेत. नवाब मलिक हे २३ फेब्रुवारीपासून न्यायालयीन कोठडीतच आहेत.

ईडीच्या चार्जशीटमध्ये काय म्हटलं आहे?

ईडीने PMLA कोर्ट मुंबईत ही चार्जशीट दाखल केली आहे. त्या चार्जशीटमध्ये मनी लाँड्रींगच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पैसे हसीना पारकर, सलीम फ्रूट आणि सरदार शहावली खान यांना कॅश आणि चेकच्या स्वरूपात पैसे दिले होते हा उल्लेख करण्यात आला आहे.

या जागेचा ताबा नवाब मलिक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला. त्यांनी या जागेवर कब्जा केल्याचंही या चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. मागच्या काही वर्षांमध्ये जागेची मालकी असल्याने या जागेवर असलेल्या दुकानं, गाळे यांच्या भाडे रक्कमेतून नवाब मलिक यांना साडेअकरा कोटी रूपये मिळाल्याचंही चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे.

जे पैसे नवाब मलिक यांना मिळाले, हे पैसे हसीन पारकर, सलीम पटेल आणि शाहवली खान या तिघांना दिल्याचा उल्लेख आहे. शाहवली खानला बॉम्बस्फोटात अटक करण्यात आली आहे. हसीना पारकर दाऊदची बहीण आहे. तर सलीम पटेल उर्फ सलीम फ्रूट हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. हे पैसे दाऊदला किंवा त्याच्या गँगला फिरवण्यात आले असंही चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे.

या तीन प्रमुख गोष्टी नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT