अनिल देशमुख यांचा खासगी रूग्णालयात सर्जरीसाठी कोर्टात अर्ज, ईडीचा कडाडून विरोध

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रूग्णालयात सर्जरी आणि पुढील उपचार घेण्यासंबंधीचा अर्ज केला होता. ईडीने मात्र या सगळ्याला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची मागणी करत कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. या अर्जावरचं ईडीने दिलेलं उत्तर मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना खांद्याचा त्रास सुरू आहे. त्यांना सर्जरी करण्याची आवश्यकता आहे असं देशमुख यांच्या वकिलाने कोर्टात सांगितलं. मात्र या अर्जाला आता ईडीनेच विरोध दर्शवला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांची न्यायालयीन रवानगी करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीत १३ मेपर्यंत वाढ केल्याने न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

‘गृहमंत्र्यांला १०० कोटी कोण देतं हो?’ छगन भुजबळांकडून अनिल देशमुख यांची पाठराखण

न्यायधीश राहुल रोकडे यांनी विचारलं की अनिल देशमुख यांना जी सर्जरी करायची आहे ती जे. जे. रूग्णालयात होऊ शकत नाही का? त्यावर अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम म्हणाले आहेत की, आम्ही जो अर्ज केला आहे तो ही सर्जरी किचकट आहे. आम्ही त्यासंदर्भातली हिस्ट्रीही सादर केली आहे. त्यांना हा त्रास आधीपासूनच होता. त्यानंतर हे सांगण्यात आलं की तुमची हालचाल सुधारली तर ही सर्जरी करता येऊ शकते. मात्र माझे अशील अनिल देशमुख यांना त्यानंतर या डॉक्टरांकडे जाता आलेलं नाही. माझे अशील अनिल देशमुख यांना आता तीव्र वेदना होत असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे असंही निकम यांनी कोर्टाला सांगितलं.

ADVERTISEMENT

इतकी संपत्ती कशी जमवली हे अनिल देशमुख अजुनही सांगू शकले नाहीत – ईडीची कोर्टात माहिती

ADVERTISEMENT

मात्र ईडीने या अर्जाला विरोध केला आहे. ईडीचे विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं की अनिल देशमुख यांना जे जे रूग्णालयात सर्वोत्तम उपचार मिळू शकतात. त्यानंतर ते मिळू द्या. जे. जे. रूग्णालयात हृदयविकाराचीही चाचणी करण्याची सोय आहे. त्यांना शस्त्रक्रिया करायची की नाही? किंवा खांद्याची हालचाल सुधारली तर तसा निर्णय घेता येऊ शकतो असा युक्तिवादही गोन्साल्विस यांनी केला आहे. तसंच अनिल देशमुख यांच्या वतीने करण्यात आलेल्या अर्जाला विरोध केला आहे.

अनिल देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. मनी लाँड्रींग आणि १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट हे दोन मुख्य आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT