अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशच्या अटकपूर्व जामिनाला ED चा विरोध

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ED च्या कोठडीत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशच्या अटकपूर्व जामिनाला ईडीने विरोध केला आहे. ईडीने याप्रकरणी कोर्टात आपला अर्ज दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणातील सर्व घडामोडींचा विचार केला असता, ऋषिकेशला जामिन देता येणार नाही. ऋषिकेशला जामिन मिळाल्यास तो चौकशीसाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. ऋषिकेश हा प्रभावशाली व्यक्ती असून त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सध्या प्राथमिक स्वरुपात आहे. त्यामुळे ऋषिकेश तपासात अडथळे आणून साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचं ईडीने आपल्या रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

ईडीतर्फे तपास अधिकारी तसिन सुलतान यांनी वकील श्रीराम शिरसाठ यांच्यामार्फत कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

हे वाचलं का?

“परमबीर सिंह भारतातच; त्यांच्या जीवाला मुंबईत धोका”; सर्वोच्च न्यायालयात मिळाला मोठा दिलासा

सध्या सुरु असलेल्या अनिल देशमुखांच्या चौकशीसंदर्भातली माहिती असल्यामुळे ऋषिकेश पुराव्यांसोबत छेडछाड करुन तपासात अडथळे आणू शकतो. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कार्यालयामार्फत चुकीच्या पद्धतीने वसुल करण्यात आलेल्या पैशांच्या Money Laundering मध्ये ऋषिकेशचा मोलाचा सहभाग असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर सीबीआयने केलेल्या चौकशीच्या आधारावर ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी १०० कोटींची वसुली करण्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता. हाच पैसा हवालाच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित संस्थामध्ये वळवण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

ऋषिकेश देशमुख यांनी आपले वकील इंद्रपाल सिंग आणि अनिकेत निकम यांच्या माध्यमातून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आपल्या जामीनअर्जात ऋषिकेशने ईडीच्या तपासपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यासारख्या विश्वास न ठेवू शकणाऱ्या व्यक्तींनी लावलेल्या आरोपांवरुन देशमुख कुटुंबावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी ऋषिकेशने केली आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला अटक केली होती. अनेक महिने ईडीने समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहत नव्हते. देशमुख यांनी कोर्टाची दारं ठोठवण्याचा प्रयत्नही केला, परंतू तिकडेही निराशा हाती लागल्यानंतर ते अखेरीस ईडीसमोर हजर झाले. ईडीने अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशलाही चौकशीसाठी समन्स बजावलं होतं, परंतू आतापर्यंत तो चौकशीसाठी हजर राहिलेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT