खडसे विरुद्ध महाजन वाद शमेना, ‘गिरीशभाऊंना बुधवार पेठ दाखवली पाहिजे’; खडसेंची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव: जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन यांच्यातला वाद काहीकेल्या शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, मोक्काच्या भीतीमुळे कोरोनाची लागण झाली असावी असा संशय एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ज्याला उत्तर देताना गिरीश महाजनांनी खडसेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्याची गरज असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा विद्याप्रसारक संस्थेचा वाद: गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी

हे वाचलं का?

रविवारी पुणे पोलिसांनी जळगावमध्ये केलेल्या धाडसत्रानंतर एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर बोचरी टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. नाथाभाऊंना ठाण्याला पाठवण्याची गरज नाही पण गिरीशभाऊंना पुण्यातली बुधवार पेठ दाखवली पाहिजे असं म्हणत खडसेंनी महाजनांवर पलटवार केला आहे. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी रविवारी गिरीश महाजन यांच्या निटकरवर्तीयांच्या घरावर छापेमारी केली. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादासंदर्भात महाजनांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे.

मराठा विद्या प्रसारक संस्थेचा जळगावात मोठा भूखंड आहे. गिरीश महाजन मंत्री असताना Adv. विजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यात मारहाण करण्यात आली होती. गिरीश महाजनांच्या माणसांनी पुण्यात आपलं अपहरण केल्याचाही आरोप विजय पाटील यांनी केला आहे. पुण्यातून सुटका झाल्यानंतर विजय पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतू गिरीश महाजन मंत्री असल्यामुळे तो गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नाही असा आरोप विजय पाटील यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT