अजित पवारांना शिंदेंकडून ‘सरकारी विमान’, नागपुरात पडद्यामागे काय घडलं?

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर देशमुख वर्षभरानंतर तुरूंगातून बाहेर येणार आहेत. देशमुखांची राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे मुंबईत येऊन भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या त्या सरकारी विमानामुळे. अजित पवारांना नागपूरहून मुंबईला येण्यासाठी शासकीय विमान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर देशमुख वर्षभरानंतर तुरूंगातून बाहेर येणार आहेत. देशमुखांची राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे मुंबईत येऊन भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या त्या सरकारी विमानामुळे. अजित पवारांना नागपूरहून मुंबईला येण्यासाठी शासकीय विमान उपलब्ध करून दिल्यानं शिंदे सरकारने घातलेल्या या हवाई पायघड्यांची जोरात चर्चा सुरू झालीये.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेते फारसे आक्रमक भूमिका घेत नाहीत, अशी चर्चा अजित पवारांबद्दल सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याची कुजबूजही समोर आली. त्यामुळे अजित पवार गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. आता अजित पवार चर्चेत आलेत, ते सरकारने उपलब्ध करून दिलेल्या शासकीय विमानामुळे.

अजित पवार अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी बुधवारी (28 डिसेंबर) मुंबईला येणार आहेत. मुंबईला येण्यासाठी सरकारने अजित पवारांना शासकीय विमान उपलब्ध करून दिलं. त्यामुळे सभागृहात आणि वरवर शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष दिसत असला तरी आतून मात्र सारं काही आलंबेल असल्याची चर्चा सुरू झालीये. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनीच खुलासा केलाय.

फडणवीस ते गोगावले : अजित पवारांनी एक तास वाभाडे काढले; सभागृह फक्त ऐकत राहिलं!