एकनाथ शिंदे गटाचं निवडणूक आयोगासमोर शक्तीप्रदर्शन, 21 राज्यातील अध्यक्षांच्या बैठका
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदिपान भुमरे, प्रकाश सुर्वे, दादा भुसे असणार आहेत. उदय सामंत सकाळीच दिल्लीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी झी २४ तास या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं आहे. एकनाथ शिंदे गटाचं निवडणूक आयोगासमोर शक्तीप्रदर्शन, उदय सामंत म्हणाले… उद्योग मंत्री […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदिपान भुमरे, प्रकाश सुर्वे, दादा भुसे असणार आहेत. उदय सामंत सकाळीच दिल्लीला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी झी २४ तास या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे गटाचं निवडणूक आयोगासमोर शक्तीप्रदर्शन, उदय सामंत म्हणाले…
उद्योग मंत्री उदय सामंत झी २४ तास या वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले ” एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव महाराष्ट्रामध्ये केला, तो महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. विविध राज्यातील राज्यप्रमुखांनी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन दिलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने २१ अध्यक्षांची बैठक असावी. आता एकनाथ शिंदे आल्यावरच कळेल की शिंदे साहेब नक्की कशासाठी येत आहेत.”
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निर्माण झाला आहे. तो वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार ते फ्रिज होणार का? याची अजून स्पष्टता झालेली नाही, त्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. आज एकनाथ शिंदेंची विविध राज्यातील २१ अध्यक्षांसोबत बैठक असल्याने शिंदे निवडणूक आयोगासमोर शक्तीप्रदर्शन करणार आहेत, असं वृत्त झी २४ तासनं दिलं आहे.
हे वाचलं का?
दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाले उदय सामंत?
शिवाजी पार्कवरती कोणाची सभा होणार याची स्पष्टता झालेली नाहीये. शिंदे गट आणि शिवसेना दोघांनी सभेसाठी अर्ज केलेला आहे. ‘फस्ट कम फस्ट सर्व’ चा नियम लावून एकनाथ शिंदे गटाला बीकेसीचे मैदान दिलेलं आहे. त्याच धर्तीवरती शिवसेनेला शिवाजी पार्क मिळावं अशी इच्छा उद्धव ठाकरे यांच्या गटाची आहे. त्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले ” शिवाजी पार्कवरती मेळावा होणार का नाही याबाबत स्वत: एकनाथ शिंदे बोलतील. मेळावा कुठे करायचा याबाबत मुख्यमंत्रीच बोलतील. आम्ही दुसरं एक मैदान देखील बूक करुन ठेवलेलं आहे, परंतु शिवतीर्थावरच आमचा मेळावा व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचं” उदय सामंत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT