Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे जितेंद्र आव्हाडांवर बरसले, दाखवला फोटो
Eknath shinde hits out jitendra awhad after awhad raised law and order situation in maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेवरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत उत्तर दिले.
ADVERTISEMENT
Eknath Shinde vs Jitendra Awhad, Maharashtra budget Session : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर सातत्याने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड सातत्याने शिंदेंना लक्ष्य करत असून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून आव्हाडांनी शिंदेंवर टीका केली. त्यावर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला. शिंदेंनी आव्हाडांविरुद्ध असलेल्या गुन्ह्यातील फोटो सभागृहात दाखवला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “जितेंद्र आव्हाड इकडे नाहीये, त्यांनी कायदा सुव्यवस्था याबाबतीत एवढा मोठा आकांततांडव केले. राज्यात, ठाण्यात गुंडागर्दी झालीये. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले, असं म्हणाले. मी सांगू इच्छितो की, त्यांनी जे काही कृत्ये केलेले आहे, त्यांच्या लोकांनी”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी अनंत खरमुसे यांच्या मारहाणीचा फोटो सभागृहात दाखवला.
अनंत खरमुसे प्रकरण : एकनाथ शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांना काय दिले उत्तर?
“अनंत खरमुसे नावाच्या माणसाला किडनॅप केले. त्याला जनावरासारखे मारले. त्यांनी (जितेंद्र आव्हाड) म्हटलेलं आहे की, पोलिसांचा दुरूपयोग चालला आहे. पोलिसांचा गैरवापर करत आहेत. पोलिसांवर दबाब आणत आहेत. दुसरीकडे हे. याला काय म्हणायचे? सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली. मंत्री पदाचा दबाव आणून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. मॉलमध्ये जाऊन मारहाण, कधी अधिकाऱ्याला मारहाण, हे लोक कोणाचे आहेत?”, असा सवाल शिंदेंनी आव्हाडांना केला.
हे वाचलं का?
वाचा – देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ प्रकरण काढलं बाहेर, नेमके आरोप काय?
“तुम्हाला कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. याचा तपास आम्ही सूड भावनेने करणारन नाही. तुम्ही पूर्वी काय काय केले यामध्ये जाऊ इच्छित नाही. पंरतु हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. कायद्यासमोर कुणी छोटा मोठा नाही. जो चुकीचा असेल, जो जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल”, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांवर दिले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?
“माझ्या मुलीला आणि जावयाला ठार मारण्याची भाषा करणाऱ्या महेश आहेर या सरकारी अधिकाऱ्याच्या रूपात वावरणाऱ्या एका कुविख्यात गुंडाला हे सरकार पोसत आहे. त्याच्या 8 तासांच्या ऑडियो क्लिप्स आम्ही बाहेर काढल्या आहेत. त्यात हा मुजोर अधिकारी स्पष्टपणे म्हणतोय की,’मी टाईट होवून सीएम ला फोन लावला.मी सीएमच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो. मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोन आलेत,ते म्हणाले की, साहेब तुम्ही काळजी करू नका,तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.’
ADVERTISEMENT
वाचा – Aditya Thackeray यांचं BMC CAG Report वरुन Eknath Shinde- Fadnavis यांना प्रत्युत्तर
यासोबतच हा आहेर मनपात बसून करोडोंच्या व्यवहारांच्या वार्ता करतोय. जर हा 10 वी पास माणूस इतके मोठे व्यवहार करतोय आणि ठाणे मनपा आयुक्त याबाबत अनभिज्ञ असतील तर मनपाचा कारभार नेमका कसा चालला आहे, हे देखील लोकांना आता समजत आहे.
ADVERTISEMENT
मुलीबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक #VidhanSabha #JitendraAwhad #MaheshAher pic.twitter.com/JETfCiNUez
— Mumbai Tak (@mumbaitak) March 15, 2023
दुसरीकडे मी सीएम चा मुलगा आहे असं देखील बोलायला महेश आहेर कमी करत नाही. इतक्या हक्काने तो बोलत असला तर मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावं की,आपण या दत्तक घेतलेल्या पुत्राच्या प्रेमापोटी काही कारवाई करत नाही आहात का? दाऊद गँग ची संबंधित असणाऱ्या एका कुविक्यात गुंडाला राज्याचे मुख्यमंत्री राजकीय संरक्षण का देत आहेत..? हे नेमक कोणते नाते आहे?”, असं आव्हाड म्हणालेले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT