‘खोके कुठे जातात, माझ्याकडे सगळा हिशोब! बोलायला भाग पाडू नका’; एकनाथ शिंदेंचा दुसऱ्यांदा इशारा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केलेल्या आमदारांवर सातत्यानं ‘५० खोके’ म्हणत टीका होतेय. विशेषतः शिवसेनेकडून ही टीका होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून पुन्हा एकदा इशारा दिलाय. ‘खोके कुठे जातात? याचा माझ्याकडे सगळा हिशोब आहे’, असं शिंदे म्हणालेत. मंगळवारी (३० ऑगस्ट) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे नेते विजय वाडकर यांच्यासह […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केलेल्या आमदारांवर सातत्यानं ‘५० खोके’ म्हणत टीका होतेय. विशेषतः शिवसेनेकडून ही टीका होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून पुन्हा एकदा इशारा दिलाय. ‘खोके कुठे जातात? याचा माझ्याकडे सगळा हिशोब आहे’, असं शिंदे म्हणालेत.
मंगळवारी (३० ऑगस्ट) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे नेते विजय वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनात शिंदेंची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ५० खोक्यांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.
“बाळासाहेबांनी आपल्या विचारांशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी त्यांनी सत्तेला लाथ मारण्याचं काम केलं. ते म्हणायचे की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांना कधीही जवळ करता येणार नाही. त्यांना जवळ करण्याची वेळ येईल, तेव्हा मी माझं दुकान म्हणजे शिवसेना पक्ष बंद करेन, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली होती. बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून आपण शिवसेना मोठी केली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.