देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं; एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शपथविधीकडे नजरा लावून असलेल्या राज्यातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

ADVERTISEMENT

राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. जवळपास ५० आमदार एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास घेऊन पुढे जाणार आहोत.”

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंना विकास कामे आणि अडचणींची माहिती दिली. चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. आपण एकत्र निवडणुका लढवल्या. याबद्दल बोललो. महाविकास आघाडी स्थापन झाली. पण मतदारसंघाचे प्रश्न आणि निवडणुकांत येणाऱ्या अडचणी बघितल्या, तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडे जात असल्याचं दिसलं.”

हे वाचलं का?

“राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही मंत्रिमंडळातील सहकारी, त्यांच्यावर झालेल्या कारवाया. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. त्यातील काही निर्णय झाले आहेत आणि त्याचं स्वागत आम्ही करतो,” असं शिंदे म्हणाले.

“५० आमदार जेव्हा भूमिका घेतात, तेव्हा याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. कारण नगरसेवक सुद्धा असं पाऊल उचलत नाही. आमदारांनी मला त्यांचे प्रश्न सांगितले. मग हा निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घ्यावा लागला,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

“देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला. त्यांच्याकडे जास्त संख्याबळ असताना ते मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकले असते. पण त्यांनी मोठं मन दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे,” असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

“जे घडलं ते तुमच्यासमोर आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम करू. राज्याला विकासाकडे नेण्याचं काम केलं जाईल. देवेंद्रजी आमच्या पाठिशी आहेत. ते मंत्रिमंडळात नसले, तरी ते आमच्यासोबत आहेत.”

“आजकालच्या राजकारणात काय मिळेल हे आपण पाहत असतो. त्यांनी मिळत असताना देखील त्यांनी देण्याची उदारता दाखवली आहे. त्यामुळे मी त्यांना आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या सहकारी आमदारांनाही धन्यवाद. त्यांनी ताकद दाखवली,” असंही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT