Shiv Sena fight : एकनाथ शिंदेच पक्षप्रमुख! शिंदे गटाने पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका

मुंबई तक

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं राजकीय वैमनस्य टोकाला गेलंय. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वाविरुद्ध म्हणजेच उद्धव ठाकरेंविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आणि सरकारही पाडलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धनुष्यबाण आणि पर्यायाने शिवसेनेवरच शिंदे गटाने दावा केलाय. त्यामुळेच जर धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला, तर त्यांचे पक्षप्रमुख कोण असतील असा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं राजकीय वैमनस्य टोकाला गेलंय. एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वाविरुद्ध म्हणजेच उद्धव ठाकरेंविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आणि सरकारही पाडलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धनुष्यबाण आणि पर्यायाने शिवसेनेवरच शिंदे गटाने दावा केलाय. त्यामुळेच जर धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला, तर त्यांचे पक्षप्रमुख कोण असतील असा मुद्दा उपस्थित होत होता. त्यावर शिंदे गटानेच स्पष्टपणे भूमिका मांडलीये.

एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांनासोबत घेऊन बंड केलं. नंतर शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदारही आपल्या गटात ओढले. आमदार, खासदार आणि उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केलेल्या जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी स्वतःच्या गटात सामील करून घेतलं. त्यानंतर एक बैठक घेतली आणि थेट शिवसेनेची सुत्रं हाती घेण्याचा पहिला प्रयत्न केला.

बहुमत आमच्या बाजूने असल्याचा दावा करत मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत थेट शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना सर्व अधिकार देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेसाठी शिंदे आणि ठाकरे यांच्यात खरी लढाई सुरू झाली.

महंत सुनील महाराजांचा शिवसेनेत प्रवेश, संजय राठोडांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा प्लान ठरला?

हे वाचलं का?