पंजाबमध्ये झटका; उत्तर प्रदेशात सुपडा साफ; काँग्रेस करणार आत्मचिंतन
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पंजाबमधून काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मानहानीकारक पराभव झाला आहे. गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही काँग्रेसची निराशा झाली आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही जनादेश स्वीकारल्याचं म्हटलं आहे. […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. पंजाबमधून काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मानहानीकारक पराभव झाला आहे. गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही काँग्रेसची निराशा झाली आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही जनादेश स्वीकारल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पाच राज्यातील निकालावर भूमिका मांडली. “निवडणूक निकालावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस कार्यकारी समितीची लवकरात लवकर बैठक बोलावण्याचा निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला आहे. या बैठकीत चिंतन केलं जाईल,” असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
‘तुम्हालाही काहीतरी करायचंय’; पंजाबचं तख्त जिंकताच केजरीवालाची भारतीयांना हाक
“उत्तर प्रदेशात काँग्रेस पुर्नजीवित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, मात्र त्याचं मतांमध्ये परिवर्तन करु शकलो नाही. उत्तराखंड आणि गोव्यामध्येही आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली, मात्र जनतेचं मन जिंकू शकलो नाही आणि बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहचू शकलो नाही”, असं सुरजेवाला म्हणाले.