Elon Musk ट्विटरचं प्रमुख पद सोडणार का? पोलमध्ये युजर्संनी दिला मोठा सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इलॉन मस्क आता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचं सीईओ पद सोडणार का? असा सवाल सध्या युजर्संकडून विचारला जात आहे. त्याला कारणही तसंच आहे. मस्क यांनी सोमवारी ट्विटरवरुन एक पोल जारी करत ‘सीईओ पदावरुन आपण पायउतार व्हायला हवं का?’ याबाबत युजर्संना विचारणा केली होती. ज्यात तब्बल 57 टक्के लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलं आहे. मस्क यांनी पोलवर जो काही निकाल येईल त्याचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळेच आता ते सीईओ पदावरुन पायउतार होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटर विकत घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे अन् धडाकेबाज निर्णय घेत आहेत. अशातच त्यांनी आज ट्विटरवरुन एक पोल प्रसिद्ध करत युजर्संना बुचकाळ्यात पाडलं होतं. ‘आपण ट्विटरच्या सीईओपदावरुन पायउतार व्हायला हवं का?’ असा सवाल त्यांनी विचारला अन् त्यावर युजर्संनी त्यांचं मत द्यावं असं आवाहन केलं. यात जे काही मत देतील त्याचं पालनं केलं जाईलं असं आश्वासनही दिलं होतं.

त्यानुसार मस्क यांच्या या पोलवर दुपारी 4 वाजून 50 मिनिटांपर्यंत तब्बल 1 कोटी 75 लाख 2 हजार 391 युजर्संनी मत नोंदवलं. यात 57.5 टक्के म्हणजेच जवळपास 1 कोटीहून अधिक युजर्संनी त्यांना ‘होय, ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार व्हायला हवं’ असा सल्ला दिला तर 42 टक्के लोकांनी ‘नाही’ असा सल्ला दिला. त्यामुळे मस्क आता दिलेल्या आश्वासनानुसार सीईओ पदावरुन बाजूला होणार का? या चर्चांना उधाणं आलं आहे.

हे वाचलं का?

मागील काही दिवसांपासूनच ट्विटरच्या सीईओ पदाच्या खुर्चीबाबत इलॉन मस्क लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. ट्विटरचे सीईओ म्हणून आणखी काळ काम करण्याची आपली इच्छा नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. त्यामुळे या पदावर नवीन व्यक्तीला आणू असंही त्यांनी जाहीर केलं होतं.

ADVERTISEMENT

यापूर्वी 17 नोव्हेंबर रोजी मस्क म्हणाले होते की, ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांना याच कंपनीत बराच वेळ द्यावा खर्ची घालावा लागत आहे. यामुळे जुन्या कंपनीसाठी म्हणजेच टेस्लासाठी कमी वेळ मिळतं आहे. मस्क यांनी ट्विटरला अधिक वेळ दिल्यानंं टेस्लाच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळेचं मस्क आता नवीन ट्विटर लीडरच्या शोधात आहेत. त्यांनी ट्विटरवर एक बोर्ड स्थापन करण्याचाही मानस व्यक्त केला होता. यानंतर त्यांना ट्विटरवर कमी वेळ द्यावा लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT