Twitter युजर्सना मोजावे लागणार पैसे, एलॉन मस्क यांनी केली मोठी घोषणा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी खरेदी केलं आहे. या डीलनंतर एलॉन मस्क यांची जगभरात चर्चा होते आहे. अशात त्यांनी हे संकेत दिले आहेत की लवकरच ट्विटर युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचा वापर सध्या मोफत आहे. मात्र लवकरच ते वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे संकेत एलॉन […]
ADVERTISEMENT

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी खरेदी केलं आहे. या डीलनंतर एलॉन मस्क यांची जगभरात चर्चा होते आहे. अशात त्यांनी हे संकेत दिले आहेत की लवकरच ट्विटर युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचा वापर सध्या मोफत आहे. मात्र लवकरच ते वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे संकेत एलॉन मस्क यांनी दिले आहेत.
“एलॉन मस्क यांनी हे देखील सांगितलं आहे कॅज्युअल युजर्ससाठी Twitter कायमच मोफत असेल मात्र सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत”
एलॉन मस्क
एलॉन मस्क यांनी हे देखील सांगितलं आहे कॅज्युअल युजर्ससाठी Twitter कायमच मोफत असेल मात्र सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एलॉन मस्क यांनी मंगळवारी न्यूयॉर्कच्या मेट गालामध्येही उपस्थिती लावली होती. ट्विटरच्या यशाचं पुढचं पाऊल हे आहे की युजर्ससाठी आम्ही आणखी ट्विटरचा विस्तार करतो आहोत. अमेरिकेतला एक मोठा हिस्सा ट्विटरवर असला पाहिजे आणि त्यांनी संवादात सहभागी झालं पाहिजे अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.