Emergency : कंगनाच्या सिनेमात मिलिंद सोमण दिसणार सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल सध्या बोललं जातंय. या सिनेमात कंगना रणौतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची दिसणार आहे. कंगनाच्या इमर्जन्सी (emergency) सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आलीये. या सिनेमात अभिनेता मिलिंद सोमण फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारत आहे. सॅम मानेकशॉ यांच्या वेशभूषेतील पोस्टर समोर आलं असून मिलिंद सोमणचा लुक हुबेहूब जुळून आलाय.

ADVERTISEMENT

अभिनेता अनुपम खेर आणि मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे नंतर आता कंगना रनौतच्या सिनेमात मिलिंद सोमनची एन्ट्री झालीये. इमर्जन्सी सिनेमातील मिलिंद सोमणचा लुक बघून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.

एमर्जन्सी (emergency) सिनेमातील लुक बघून मिलिंद सोमण या भूमिकेतून चाहत्यांना भूरळ पाडणार असंच दिसतंय. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाचे नायक होते. त्यामुळे मिलिंद सोमणची सॅम मानेकशॉ यांची एमर्जन्सी सिनेमातील भूमिका बघण्यासारखी असणार आहे.

हे वाचलं का?

मिलिंद सोमणला फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका देण्याबद्दल अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, मिलिंद सोमणचं अभिनयातील गुणवत्ता बघता, तो सॅम मानेकशॉ भूमिकेसाठी परिपूर्ण वाटला.’

ADVERTISEMENT

emergency : मिलिंद सोमण कंगना रणौतबद्दल काय म्हणाला?

कंगनाच्या एमर्जन्सी सिनेमात सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारत असलेला मिलिंद सोमण म्हणाला, ‘कंगनासोबत काम करण्याची संधी मिळल्याचा मला आनंद आहे. मला तिचं काम खूपच आवडलं. क्वीन आणि तनू वेड्स मनू मध्ये मला तिचा अभिनय विशेष आवडला. मी तिच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास उत्सुक आहे. फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी सन्मान असून, माझ्यावर मोठी जबाबदारीही आहे.’

ADVERTISEMENT

कंगनाच्या सिनेमात महिमा चौधरी कुणाच्या भूमिकेत?

‘दाग : द फायर’, ‘कुरूक्षेत्र’, ‘धडकन’ यासह इतर सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री महिमा चौधरी कंगना रणौतच्या एमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. मणिकर्णिकानंतर आता कंगना एमर्जन्सी चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, महिमा चौधरीलाही भूमिका देण्यात आलीये.

कंगनाने शेअर केलेल्या फर्स्ट लुकनुसार महिमा चौधरी या सिनेमात ज्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे पुपुल जयकर. पुपुल जयकर एक लेखिका होत्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पुपुल जयकर यांच्यात घनिष्ठ मैत्र होते आणि त्यांचं आत्मचरित्र जयकर यांनी लिहिलेलं. असं म्हणतात की, इंदिरा गांधी त्यांच्या सर्व गोष्टी त्यांना सांगायच्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT