संप संपवा, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका! एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांची कळकळची विनंती
सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे, आता टोकाची भूमिका आम्हाला घ्यायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याच प्रमाणे संप मिटवावा असंही म्हटलं आहे. जळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे, परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत, त्यामुळं एसटी […]
ADVERTISEMENT

सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे, आता टोकाची भूमिका आम्हाला घ्यायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याच प्रमाणे संप मिटवावा असंही म्हटलं आहे. जळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे, परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत, त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावं असंही त्यांनी म्हटलं आहे

मागील दोन महिन्यांहून जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यात संप सुरू आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त पगारवाढ दिली आहे. तरीही हा संप मागे घेण्यात आलेला नाही. आता या संपकऱ्यांना अजित पवारांनी नीरवानीरवीचा इशारा दिला आहे.










