Hasan Mushrif Case: राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफांभोवती ईडीचा फास आवळणार?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

hasan mushrif latest news : अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना आणि सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने मनी लॉडरिंगचा गुन्हा दाखल केला असून, तपासही सुरू केला आहे. दरम्यान, ईडीकडून शनिवारी (11 मार्च) हसन मुश्रीफ यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं असून, त्यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (enforcement directorate summons to hasan mushrif in money laundering case)

अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं ताब्यात घेतला होता. या कंपनीचे मालक मुश्रीफांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे होते. ब्रिक्स इंडियाला कारखाना देताना प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही. त्याचबरोबर हसन मुश्रीफ हे सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाने 127 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार आणि मनी लाँडरिंगमध्ये सामील आहेत, असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेले आहेत.

याच प्रकरणात ईडीने मनी लॉडरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात हसन मुश्रीफांची चौकशी सुरू असून, यापूर्वीच ईडीकडून कागल, कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हसन मुश्रीफ यांना ईडीचं समन्स, अटकेची शक्यता

दीड महिन्याच्या काळातच दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या मालमत्तांवर धाड पडली आहे. शनिवारी (11 मार्च) ईडीच्या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांची चौकशी करण्यात आली. तब्बल 9 तास हसन मुश्रीफ यांच्या घरीच त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, आज चौकशी केल्यानंतर हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास मुश्रीफ यांना सांगण्यात आलं आहे. ईडीकडून कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं असल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांनाही ईडीकडून अनेकदा चौकशी केल्यानंतर कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं आणि अटक केली होती. त्यामुळे मुश्रीफांच्या अटकेची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

मुश्रीफ यांच्या घरी जानेवारी महिन्यामध्ये ईडीचे पथक आले होते. त्यावेळी ईडीकडून तब्बल तेरा तास चौकशी केल्यानंतर हे पथक घरातून बाहेर पडलं होतं. मागील फेब्रुवारी महिन्यात पुन्हा ईडीचे पथक हे कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक इथं जवळपास दोन दिवस तीस तासांहून अधिक काळ या ठिकाणी या बँकेत वेगवेगळ्या असं मुश्रीफ यांच्या संबंधित खाते व व्यवहाराची चौकशी केली. बाहेर पडते वेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्र देखील ताब्यात घेण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ईडीची धाड, मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक

ईडीने पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज छापा टाकला. मुश्रीफांच्या घरावर छापा टाकल्यानंतर कागलमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. याच वेळी येथील सागर दावणे या कार्यकर्त्याने स्वत:चे डोके आपटून घेतले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात न जाता कार्यकर्ता मुश्रीफांच्या घरासमोरच घोषणाबाजी करत राहिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT