CM शिंदेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा अवघ्या दोन महिन्यांत लिलाव करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षभराच्या काळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होतो आणि ती रक्कम नमामि गंगा प्रकल्पासाठी दिली जाते. या लिलाव झालेल्या तब्बल 1200 वस्तूंमध्ये या मूर्तीचाही समावेश होता. दिल्लीतील मॉडर्न आर्ट […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा अवघ्या दोन महिन्यांत लिलाव करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षभराच्या काळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होतो आणि ती रक्कम नमामि गंगा प्रकल्पासाठी दिली जाते. या लिलाव झालेल्या तब्बल 1200 वस्तूंमध्ये या मूर्तीचाही समावेश होता.
दिल्लीतील मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या मूर्तीसाठी बोली सुरु करण्याची किंमत 10 हजार 800 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पहिल्यांदा दिल्लीत आले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मोदी यांना भेट दिली होती.
महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 आणि 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा अशा सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.