‘मोठा वाटा भाजपकडे गेला म्हणून त्यात चुकीचं काय?’ छगन भुजबळांकडून फडणवीसांची पाठराखण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रविवारी शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने भाजपच्या मंत्र्यांना महत्वाचे खाते देण्यात आले, असा सूर ऐकायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जरी केलं असलं तरी मलाईदार खाते स्वतःकडे ठेवलीत, अशी चर्चा सुरु झालीय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपची पाठराखण केली. नाशिक येथे ते बोलत होते.

ADVERTISEMENT

काय म्हणाले छगन भुजबळ?

महत्वाची खाती फडणवीसांकडे आहे, याकडे आपण कसं बघता, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी भुजबळांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले, भाजप आणि त्यांचे सहयोगी यांची संख्या जवळपास 115 ते 120 आहे. शिंदे गटातील सदस्य संख्या फक्त चाळीस आहे. त्यामुळे मुख्य वाटा जर भाजपाकडे गेला असेल तर त्यात चुकीचं काय, असं भुजबळ म्हणाले.

असंही मुख्यमंत्री सर्व खात्याचं प्रमुख असतो. मुख्यमंत्री तुमच्याकडे आहे. कुठेही काही निर्णय घ्यायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचं निर्णय अंतिम असतो, असं देखील भुजबळ म्हणाले. शिंदे गटातील अनेकांनी आम्ही सत्तेसाठी इथे आलो नाही असं सांगितलं होतं, मग आता रडायचं काय कारण आहे, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी लगावला.

हे वाचलं का?

वंदे मातरमवरून मुख्यमंत्र्याना लगावला टोला

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवरून हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याची सक्ती केली आहे. यावरून आता सर्व स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. काहींनी याला विरोध देखील दर्शवला आहे. त्यामुळे यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरच नाशिक बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्तापर्यन्त फोनवर जय महाराष्ट्र म्हणायचे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे त्यांना विचारायला पाहिजे, असा टोमणा भुजबळांनी लगावला.

शिंदे यांनी आता थेट सुधीर मुनगंटीवार यांनाच जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे विचारलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणतात. पोलीस जय हिंद बोलतात. त्यात कोणी वंदे मातरम म्हटले तर गैर काय? असा सवाल करतानाच कायद्याने आशा गोष्टी होत नाहीत. मी जय महाराष्ट्र नाहीतर जय हिंद बोलेल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT