अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेवर माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचे एकहाती वर्चस्व

मुंबई तक

अमरावती : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या समजल्या जाणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी विकास पॅनेलचे नरेशचंद्र ठाकरे यांचा तब्बल ११७ मतांनी पराभव केला. देशमुख यांना ३८९ तर ठाकरे यांना २७२ मते मिळाली. सत्ताधारी प्रगती पॅनेलचे ९ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावती : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या समजल्या जाणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी विकास पॅनेलचे नरेशचंद्र ठाकरे यांचा तब्बल ११७ मतांनी पराभव केला. देशमुख यांना ३८९ तर ठाकरे यांना २७२ मते मिळाली.

सत्ताधारी प्रगती पॅनेलचे ९ पैकी ८ उमेदवार निवडून आले. ४ उमेदवार कार्यकारी सदस्यपदी तर उपाध्यक्ष पदी अॅड. गजानन पुंडकर आणि अॅड. जयवंत पाटील पुसदेकर यांची निवड झाली. शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. काल याची ९ जागांसाठी निवडणूक पार पडली. यात २१ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाले होते.

वादाने गाजली निवडणूक :

दरम्यान काल झालेल्या मतदानावेळी मतदान केंद्रावर राडा झाला होता. मतदान केंद्रावर दोन गटात मतदान केंद्रात लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार डॉ. दिनकरराव गायगोले यांचे बंधू रवींद्र गायगोले व प्रगती पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघेही एक दुसऱ्याच्या अंगावर धावून गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp