लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव

मुंबई तक

सध्या महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सरकारनेही आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं ९० दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

सध्या महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सरकारनेही आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं ९० दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडून पडेल आणि रंगकर्मींची अवस्था वाईट होईल, या भितीपोटी रंगमंच कामगार,निर्माते आणि कलाकारांनी लॉकडाऊन करू नका अशी कळकळीची विनंती राज्य सरकारला केली आहे.

गेल्या वर्षी मार्च अखेरीस नाट्यगृहांना लागलेले टाळे जवळपास नऊ महिन्यांनी उघडले. या नऊ महिन्यांच्या काळात रंगमंच कामगार, कलाकार, निर्माते यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. त्यातून सावरत आता कुठे नाट्यक्षेत्र कार्यरत झाले. परंतु राज्यात करोना पुन्हा पाय पसरू लागल्याने सरकारने नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर नाट्य क्षेत्राचे गेल्यावर्षी झाले त्याहून दुप्पट नुकसान होईल, अशा भावना रंगकर्मींनी व्यक्त केल्या आहेत. ‘गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले. आज सर्व उपायांचे पालन करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असे संकट कोसळू नये,’ अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली. यासंदर्भात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, निवेदिता सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, निर्माते-दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, भारत जाधव, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री निर्मिती सावंत, प्रतीक्षा लोणकर, कविता मेढेकर आदी कलाकारांनी चित्रफित तयार करून उपाययोजनांची कठोरतेने अंमलबजावणी करा परंतु नाट्यगृह बंद करू नका असे’ असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

हे वाचलं का?