फेसबुक, इन्स्टाग्रामचं चाललंय काय?; आठवडाभरात दुसऱ्यांदा डाउन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

फेसबुकसह व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाउन झाल्यानं जगभरातील ‘सोशल’ जनजीवन ठप्प झालं होतं. त्याबद्दलच्या कारणांचा खुलासा करत फेसुबकने माफीही मागितली होती. मात्र, आठवडाभराच्या आतच दुसऱ्यांदा फेसुबक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर डाउन झालं होतं. दुसऱ्यांदा झालेल्या या प्रकाराबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Facebook-Instagram Down secondly in a week)

ADVERTISEMENT

फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्रभर डाउन झाल्यानं सोशल मीडियावरील संदेश यंत्रणा ठप्प झाली होती. सोमवारी झालेल्या या प्रकारानंतर असंच शुक्रवारीही झालं. शुक्रवारी पुन्हा एकदा फेसबुक, इन्स्टाग्राम, मेंसेजर या सेवा डाउन झाल्या होत्या.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर अॅप व सेवेचा वापर करणाऱ्या यूजर्सना फोटो अपलोडपासून मेसेजिंगपर्यंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. फेसबुक इंकने याला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियातील महत्त्वाची कंपनी असलेल्या फेसबुकच्या सेवेत डेटा सेंटरच्या नियमित कामादरम्यान खंड पडला होता. यामुळे यूजर्संना पुन्हा सहा तास सेवेपासून वंचित राहावं लागलं.

हे वाचलं का?

हुश्श… ‘सोशल’ जीवन पूर्वपदावर! 6 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा पूर्ववत

फोटो अपलोडिंग आणि व्हिडीओ शेअरिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम डाउन झालं होतं. काही तासानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा पूर्ववत सुरू झाली असून, याबद्दल इन्स्टाग्रामनंही ट्वीट करून माहिती दिली आहे. सर्व गोष्टी सुरळीत करण्यात आल्या आहेत. आता सर्वकाही सर्वसामान्यपणे सुरू व्हायला हवं. आमच्यासोबत राहिल्याबद्दल आभार’, असं इन्स्टाग्रामने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

फेसबुकनेही दुसऱ्यांदा झालेल्या नेटवर्क डाउनबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘आम्हाला माहिती आहे की काही यूजर्सना आमचं अॅप आणि इतर सेवा वापरण्यास अडचण येत आहे. आम्ही सेवा लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाचा प्रयत्न करत आहोत. असुविधेसाठी दिलगीर व्यक्त करतो’, असं फेसबुकने म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

Facebook Server Down: Whatsapp, Facebook आणि Instagram बंद का पडलं होतं?

फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा डाउन झाल्यानंतर ट्विटरवर #Instadown चा ट्रेंड सुरू झाला होता. सलग आठवडाभरात दुसऱ्यांदा फेसबुक, इन्स्टाग्राम डाउन झाल्यामुळे यूजर्सनी आपली मतही या हॅशटॅगचा वापर करून मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT