हुश्श… ‘सोशल’ जीवन पूर्वपदावर! 6 तासांनंतर व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा पूर्ववत
दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडल्यानं सगळ्यानांच चुकचुकल्यासारखे झाले. सोमवारी रात्री अचानक तिन्ही सोशल मीडियाचं सर्व्हर डाऊन झाल्याचा परिणाम जगभरात दिसून आला. त्यानंतर सहा तासांनी व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू झाली. संवाद आणि व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा बनला आहे. व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकला सरावलेल्या […]
ADVERTISEMENT

दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडल्यानं सगळ्यानांच चुकचुकल्यासारखे झाले. सोमवारी रात्री अचानक तिन्ही सोशल मीडियाचं सर्व्हर डाऊन झाल्याचा परिणाम जगभरात दिसून आला. त्यानंतर सहा तासांनी व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू झाली.
संवाद आणि व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा बनला आहे. व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकला सरावलेल्या नेटकऱ्यांचा सोमवारी गोंधळ उडाला. सोमवारी रात्री व्हाट्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या फेसबुकच्या मालकीच्या तिन्ही सेवा बंद पडल्या.
व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक बंद पडल्याचं लक्षात यायला अनेकांना वेळ लागला. संवादासाठी हल्ली महत्त्वाचं झालेलं व्हॉट्स अॅपही बंद पडल्यानं अनेकांची कामं खोळंबल्याचंही बघायला मिळालं. व्हॉट्सवरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते.
सेवा बंद पडल्यानं सगळीकडे गोंधळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. सेवा पूर्वपदावर आल्याचं कळाल्यानंतर जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.