देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचा दुरुपयोग केला, नाना पटोलेंची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूर: ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अंबानींच्या वकिलीसाठी केला. या एकाच मुद्द्यावर ते सतत बोलत राहिले. त्याशिवाय कोणत्याही महत्त्वाचे मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली नाही.’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस हे सर्व काही अंबानींच्या घरावर हेलिपॅड तयार करण्यासाठी आणि त्यांचा परिवाराला झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी करत आहेत. असाही आरोप पटोलेंनी केला.

सध्या देशात ज्या तीन कृषी कायद्याचा शेतकरी विरोध करत आहेत त्यामध्ये अंबानी परिवाराला सहानुभूती मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी विधानसभेत गदारोळ केला. त्यामुळे ही घटना संविधानविरोधी आहे. असा आरोप देखील नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.

हे वाचलं का?

‘फडणवीसांनी या अधिवेशनाचा वापर मुकेश अंबानींच्या वकिलीसाठी केला’

‘फडणवीसांनी या अधिवेशनाचा वापर मुकेश अंबानींच्या वकिलीसाठी केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक किलोमीटर अंतरावर एक गाडी ज्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या.’

ADVERTISEMENT

‘सामना’त अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसलाय, फडणवीसांचा सेनेवर वार

ADVERTISEMENT

‘ज्याचा स्फोट करुन मुकेश अंबानी यांचं घर उडविण्याचा प्रयत्न केला जाणार होता असं वक्तव्य पुढं आलं. त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत गदारोळ निर्माण केला. त्यात स्वत: फडणवीस यांनीच सांगितलं की, त्यात स्फोटकं नव्हती.’

‘आता 1 किमीच्या अंतरावर ज्या जिलेटीनच्या कांड्या सापडल्या त्या फुटल्याही असत्या, पेटल्याही असत्या तरीही अंबानींच्या घराची एक वीट देखील हलली नसती. पण हे सगळं असतानाही फडणवीसांनी ज्या पद्धतीने त्या विधानसभेचा दुरुपयोग हा अंबानींच्या घरावर हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे यासाठी.’

‘त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली पाहिजे आणि ज्या तीन काळ्या कायद्याबद्दल संपूर्ण देशातील शेतकरी हे अंबानींचा विरोध करत आहेत. पण याकडे दुर्लक्ष होऊन अंबानींना सहानुभूती प्राप्त व्हावी या पद्धतीचा प्रयत्न फडणवीसांनी विधानसभेत केलेला आहे.’

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच असं का वाटतंय भाजपला?: मुख्यमंत्री

‘त्यामुळे एका माणसासाठी आणि कोणतंही कारण नसताना विरोधी पक्षाची कामगिरी ज्या लोकांना दिलेली आहे त्याचा दुरुपयोग करणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली आणि काळी घटना आहे. ही कलंक लावणारी घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. असा दुरुपयोग विरोधी पक्षाला करता येत नाही.’ असं म्हणत नाना पटोले यांनी आता भाजपवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT