पत्नी व मुलीला संपवत शेतकऱ्याची आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून पाऊल टाकल्याचा अंदाज
अमरावती जिल्ह्यातील येवदा गावात अल्पभूधारक कापूस शेतकऱ्याने आपल्या पत्नी व मुलीला ठार करत नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवस या तिघांचेही मृतदेह घरात होते, दुर्गंध यायला सुरुवात झाल्यानंतर घर उघडलं असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव अनिल देशमुख असं असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३ एकर […]
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील येवदा गावात अल्पभूधारक कापूस शेतकऱ्याने आपल्या पत्नी व मुलीला ठार करत नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवस या तिघांचेही मृतदेह घरात होते, दुर्गंध यायला सुरुवात झाल्यानंतर घर उघडलं असता हा प्रकार समोर आला आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव अनिल देशमुख असं असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३ एकर शेतजमिन होती. याचसोबत जोडीला अनिल देशमुख कापसाचा व्यापार करायचे. मात्र गेल्या काही वर्षातली नापिकी आणि व्यापारात झालेला तोटा यामुळे देशमुख यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेतून देशमुख यांनी आपली पत्नी आणि मुलीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख दोन्ही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते.
परंतू यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे त्यांनी स्वतः गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT