Amravati: गर्दीमुळे प्रशसनाने चना खरेदी नोंदणी रद्द केली; शेतकरी संतप्त
Amravati farmer news : अमरावतीमध्ये (Amravati ) शेतकी खरेदी-विक्री सहकारी समितीच्या प्रशासनाचा गलथान कारभार पाहायला मिळाला. त्यामुळे शेतकरी (Farmers) संतप्त झाले. सोमवारी (Monday) म्हणजे आजपासून (Nafed) नाफेड चना खरेदीच्या (Online Registration ) ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार होती. अमरावतीच्या धामणगाव (Dhamangaon, amravati) रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या 24 तासापासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र […]
ADVERTISEMENT
Amravati farmer news : अमरावतीमध्ये (Amravati ) शेतकी खरेदी-विक्री सहकारी समितीच्या प्रशासनाचा गलथान कारभार पाहायला मिळाला. त्यामुळे शेतकरी (Farmers) संतप्त झाले. सोमवारी (Monday) म्हणजे आजपासून (Nafed) नाफेड चना खरेदीच्या (Online Registration ) ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होणार होती. अमरावतीच्या धामणगाव (Dhamangaon, amravati) रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या 24 तासापासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र अचानक केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे केंद्राला अखेर नोंदणी प्रक्रिया रद्द करावी लागली.
ADVERTISEMENT
बुलडाणा : योग्य भाव न मिळाल्याने २०० क्विंटल कांदा शेतकऱ्याने मोफत वाटला
केंद्राबाबत शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मोठी गर्दी
शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी शासनाकडून खरेदी केंद्र उभे केले जातात. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आधी नोंदणी करणे गरजेचे असते. अमरावतीच्या धामणगाव येथे शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्यासाठी नाफेडचे केंद्र आहे. 27 फेब्रुवरी म्हणजे आजपासून या केंद्रात नोंदणी प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याने नोंदणीप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. एकाचवेळी मोठी गर्दी झाल्याने हा निर्णय घेणार आला आहे, असं सांगण्यात येत आहे. 2 मार्च रोजी नोंदणी घेतली जाईल, अशी माहिती मिळतेय.
हे वाचलं का?
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त
केंद्राबाहेर अचानक गर्दी वाढल्याने नोंदणी बंद करावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा लागला. शेवटी वाढत्या शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे. अचानक नोंदणी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश केला. जय जवान जय किसान नारेबाजी करीत प्रशासनावर रोष व्यक्त केला. नाफेड केंद्राने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी किंवा शेतकऱ्यांना लेखी हमी द्यावी या करिता नाफेड केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. खुल्या बाजारात शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला असता, तर ही वेळ शेतकऱ्यांवर आली नसती. गुरुवारी नोंदणी न झाल्यास नोंदणी कार्यालय पेटवून देणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चेतन परडखे यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
लाखमोलाची ‘स्ट्रॉबेरी’ मातीत! महाबळेश्वरमध्ये शेतकऱ्यांनी फेकली उकिरड्यावर
ADVERTISEMENT
व्यवस्थापनाने पत्र केलं जारी
धामणगाव शेतकी खरेदी-विक्री सहकारी समितीकडून एक पत्रक जरी करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. शेतकरी महिला पुरुषांनी एकाच रांगेत उभं राहून नोंदणी करावी. एका शेतकऱ्याकडून फक्त 5 अर्ज स्वीकारले जातील, अशा सूचना जरी करण्यात आलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT