’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा अन् काळे रुमाल; मंत्री दादा भुसेंच्या कार्यक्रमात शेतकरी का भडकले?
कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे हे शनिवारी (३ सप्टेंबर) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील […]
ADVERTISEMENT

कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांना आज शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. धुळे दौऱ्यावर असलेल्या दादा भुसे यांना काळे रुमाल दाखवत आणि ५० खोके एकदम ओके म्हणत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे हे शनिवारी (३ सप्टेंबर) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील कासारे गावात विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यक्रमात दादा भुसे हे व्यासपीठावर आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधलं आणि ५० खोके आणि एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या.
‘५० खोके-एकदम ओके, मोकळं सांगून दिलेलं बरं…’; असं का म्हणाले गुलाबराव पाटील?
दादा भुसे यांच्या कार्यक्रमात शेतकरी का चिडले?
राज्यात सत्तांतर होण्याआधीच अनेक भागात प्रचंड पाऊस झाला होता. धुळे, नाशिक जिल्ह्यातही पावसांमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री होते. झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही.