Viral Video: नराधम बाप.. छोट्या मुलाला गुरासारखं बडवलं, अंगावर काटा आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद
हैदराबाद (तेलंगणा): एक नराधम बाप कशाचीही पर्वा न करता पाच ते सात वर्षाच्या मुलाला काठीने बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सध्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हीडिओतील व्यक्तीविरोधात अखेर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे. नेमकं प्रकरण काय? अवघ्या पाच ते सात वर्षाच्या मुलाला अंगावर काठी तुटेपर्यंत मार देणारा नराधम बाप आणि […]
ADVERTISEMENT

हैदराबाद (तेलंगणा): एक नराधम बाप कशाचीही पर्वा न करता पाच ते सात वर्षाच्या मुलाला काठीने बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सध्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हीडिओतील व्यक्तीविरोधात अखेर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अवघ्या पाच ते सात वर्षाच्या मुलाला अंगावर काठी तुटेपर्यंत मार देणारा नराधम बाप आणि अंगावर काठीचे घाव सोसत विनवण्या करताना दिसत आहे. मुलगा जिवाच्या आकांताने विनवणी करत असताना देखील नराधम बापाच्या काळाजाला अजिबात पाझर फुटला नसल्याचं या व्हीडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अशी माहिती मिळाली आहे की, हा व्हीडिओ तेलंगणामधील हैदराबाद शहरातील आहे.