ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी केली FIR

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. भारत विरोधी प्रचार केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाबाबत ग्लोबल सेलिब्रेटीजकडून करण्यात येणारे ट्विट हे भारताविरोधातील कटाचा एक भाग आहे असं दिसून आलं आहे. त्याचे काही पुरावे मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाशी संबंधित मुद्दे उचलून धरण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या शेतकरी आंदोलनावर तिने काही ट्विट्स केले आहेत. त्यामुळे भारतविरोधी प्रचार करणाऱ्यांच्या यादीत आता ग्रेटा थनबर्ग हे नावही आलं आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्गने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ग्रेटा म्हणते आहे की तिरस्कार पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. अजूनही मी भारतातील शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभी आहे. त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला मी पाठिंबा दर्शवला आहे. तिरस्कार, धमक्या या सगळ्यांच्या पलिकडे मानवाधिकार आहेत, त्यापेक्षा मोठं कुणीही नाही असंही ग्रेटाने म्हटलं आहे.

ग्रेटाने ट्विट केला ACTION PLAN

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताविरोधात प्रचारासाठी ACTION PLAN तयार करण्यात आला. त्याचं एक गुगल डॉक्युमेंट समोर आलं आहे. ट्विटर स्ट्रोम क्रिएट करण्यासाठीच रिहानाचं एक ट्विट करण्यात आलं होतं अशीही माहिती समोर आली आहे. ग्रेटा थनबर्गने दोन ACTION PLAN तयार केले आहेत. एकामध्ये 26 जानेवारीच्या कॅम्पेनिंगची माहिती देण्यात आली होती. ग्रेटाने 3 फेब्रुवारीला हे ट्विट केलं मग ते डिलिट केलं. त्यानंतर 4 तारखेला तिने पुन्हा एक ट्विट केलं त्यात नव्याने तयार करण्यात आलेला प्लान होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT