भास्कर जाधव रडारवर? नवी मुंबईत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
शिवसेनेतल्या फुटीपासून शिंदे गट आणि भाजपविरुद्ध आक्रमक झालेल्या ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील शिवसैनिक ए.के. मढवी यांना पोलिसांकडून तडीपार करण्यात आलं आहे. तर खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या फुटीपासून शिंदे गट आणि भाजपविरुद्ध आक्रमक झालेल्या ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील शिवसैनिक ए.के. मढवी यांना पोलिसांकडून तडीपार करण्यात आलं आहे. तर खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलीये. या घटनांच्या निषेधार्थ ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या वतीने बुधवारी (१९ ऑक्टोबर) तडीपार मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाला ठाकरे गटातल्या इतर नेत्यांबरोबर भास्कर जाधव हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या विधानांवर आक्षेप घेत नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘आपण यांना पाहिलंत का?’, भास्कर जाधवांच्या विरोधात बॅनरबाजी