जमशेदपूरच्या टाटा स्टिल प्लांटला भीषण आग, दोन जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जमशेदपूरच्या टाटा स्टिल प्रकल्पाला आग लागली आहे. गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली आहे. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना टाटा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज सकाळी १०. २० च्या सुमारास गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही आग लागली. टाटा स्टिलने याबाबत स्टेटमेंट काढून ही माहिती दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

जमशेदपूर टाटा स्टिल फॅक्टरीत कोक प्लांटमध्ये आग लागली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. त्यानंतर कोक प्लांटमधला बॅटरी ६ हा भाग बंद करण्यात आला आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. वणवा पेटण्यासह काही कंपन्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज काल आणि आज सलग दोन दिवस मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. तर काल नाशिकमध्येही 30 ते 40 एकरावर आग लागल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. काल दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

नाशिकमध्येही पेटला वणवा

ADVERTISEMENT

काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील मौजे ओझर येथील विमानतळा शेजारी आग लागली. अंदाजे 40 ते 50 एकर जमिनीवरील गवताला आग लागल्यामुळे गवत जळून खाक झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याचे एचएएल प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले. विमानतळ परिसरामध्ये असलेल्या या सोलर प्लांटचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT