Russia-Ukraine Conflict : हुश्श! विमान मुंबईत उतरताच विद्यार्थ्यांनी टाकला सुटकेचा निःश्वास
रशिया आणि य़ुक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. रशियाने युक्रेनच्या महत्वाच्या शहरांना आपला निशाण बनवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं राहतं घर सोडून बंकर, मेट्रो स्टेशनवर रहावं लागतं होतं. त्यातच युक्रेनने आपली विमानसेवा बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेरीस केंद्र सरकारच्या […]
ADVERTISEMENT
रशिया आणि य़ुक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. रशियाने युक्रेनच्या महत्वाच्या शहरांना आपला निशाण बनवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं राहतं घर सोडून बंकर, मेट्रो स्टेशनवर रहावं लागतं होतं. त्यातच युक्रेनने आपली विमानसेवा बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचा भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेरीस केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या इतर देशांशी संवाद साधत भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेतली.
ADVERTISEMENT
या मोहीमेला पहिलं यश आलं असून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं आहे.
Three Cheers For India!
Interacted with the Indian evacuees from Ukraine at the Mumbai airport.
Urged them to convey to their friends back in Ukraine that the Govt. has their back. #OperationGanga pic.twitter.com/45jIuncIWT
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 26, 2022
संध्याकाळी सात वाज पन्नाट मिनीटांनी इअर इंडियाचं AIC 1944 हे विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. या विमानात २१९ भारतीय प्रवासी होते ज्यात बहुतांश विद्यार्थी होते. या सर्वांना परराष्ट्र मंत्रालयाने बुखारेस्टची राजधानी हेनरी कोएंदा विमानतळावरुन एअरलिफ्ट केलं. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महापौर किशोरी पेडणेकर या विमानतळावर हजर होत्या.
हे वाचलं का?
“युक्रेनमधून, मुंबईत सुखरूप परत आलेल्या या सर्व भारतीय बांधवांच्या चेहऱ्यावर हे हसू बघून खूप आनंद होत आहे,” अशी भावना पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलत असताना गोयल यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मित्रांशी संवाद कायम ठेवण्याचा सल्ला दिला. युक्रेनमध्ये अडकलेल्या देशवासियांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना भारतरात आणण्यासाठी एअर इंडियाची विमानं जाणार असून दुसरं विमान रविवारी पहाटे दिल्लीत पोहचणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
Russia-Ukraine war : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना फोन
ADVERTISEMENT
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आपल्या मुलांचं स्वागत करण्यासाठी पालक आणि मित्र परिवार विमानतळावर दाखल झाला होता. अनेकांनी आपली मुलं सुखरुप परत आल्यामुळे सरकार आणि देवाचे आभार मानले. हर्षद यांची मुलगी शनिवारी मुंबईत दाखल झाली असली तरीही त्यांचा मुलगा अजुनही युक्रेनमध्ये आहे. “माझा मुलगा सुरक्षित ठिकाणी पोहचण्यात यशस्वी झाला आहे. त्याला तिकडे स्थानिकांनी मदत केली. युक्रेनमध्ये अडकलेले इतर विद्यार्थीही लवकरात लवकर परत यावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलीला दुतावासातील अधिकाऱ्यांनी मदत केली. जिकडे अद्याप युद्ध सुरु झालेलं नाही तिकडे राजदुतातील माणसं मदत करत आहेत”, अशी प्रतिक्रीया हर्षद यांनी दिली. मुलगी परत आले असली तरीही मुलगा अद्याप युक्रेनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसत होती.
मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रथमेश अग्रवाल या तरुणानेही देवाचे आभार मानले. मी घरी परतू शकलो यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही सुरक्षित स्थळी होतो, परंतू हल्ल्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. माझे अनेक मित्र किवमध्येच अडकले आहेत. अमरावतीचा अभिषेक MBBS च्या पहिल्या वर्षात शिकत होता. “माझी इमिग्रेशनची प्रक्रीया पूर्ण झालेली नसल्यामुळे मला परतीचं तिकीट मिळायला खूप कष्ट घ्यावे लागले. मी देखील तुलनेने सुखरुप जागेत होतो, पण माझे अनेक मित्र किवमध्ये अडकले आहेत त्यांना बाहेर पडणं मुश्कील झालं आहे”, असं अभिषेकने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT