अमरावतीत लॉकडाऊन, पालकमंत्री यशोमती ठाकूरांची घोषणा

मुंबई तक

अमरावती: अमरावती शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता… आता पुन्हा एकदा अमरावती शहर आणि अचलपूर शहर येथे उद्यापासून (22 फेब्रुवारी) लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. हा लॉकडाऊन आठवडाभर असणार आहे. अशी माहिती यशोमती ठाकूर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

अमरावती: अमरावती शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता… आता पुन्हा एकदा अमरावती शहर आणि अचलपूर शहर येथे उद्यापासून (22 फेब्रुवारी) लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. हा लॉकडाऊन आठवडाभर असणार आहे. अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

अमरावतीमध्ये कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागल्याने आता येथे आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘आपल्याला आज नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागत आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. कारण आता तेवढा एकच पर्याय आमच्याकडे शिल्लक राहिला आहे. साधारण सात दिवसासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू आणि एमआयडीसी सुरु राहणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सध्या प्रशासनाला कठोर राहावं लागणार आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही.’ असं यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या.

अवश्य वाचा – राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत? मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार

आज सकाळीच यशोमती ठाकूर यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत

‘येत्या काही दिवसांमध्ये नागरिकांनी जर नियमांचं पालनं केलं नाही तर शहरात लॉकडाउनशिवाय पर्याय उरणार नाही.’ असे संकेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.

हे वाचलं का?