माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, संध्या मुखर्जीं यांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने केलं जाणार असून, यात पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तथा कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांबरोबरच […]
ADVERTISEMENT

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने केलं जाणार असून, यात पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तथा कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांबरोबरच देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कला, साहित्य, संशोधन, राजकारण, सामाजिक कार्य यासह विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री तथा कम्यनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला.
प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी कोण-कोण
पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी हा नागरी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. भट्टाचार्य यांनी एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे.