परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, अटक न करण्याचे आदेश कायम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची चौकशी सुरू ठेवावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. परमबीर सिंग यांची चौकशी पोलिसांनी न करता तपास […]
ADVERTISEMENT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची चौकशी सुरू ठेवावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. परमबीर सिंग यांची चौकशी पोलिसांनी न करता तपास यंत्रणांनी करावी असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
परमबीर सिंग यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने निलंबित केलं आहे. निलंबनाच्या या आदेशाची प्रत परमबीर सिंग यांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जर आज सिंग यांना दिलासा दिला नसता तर त्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना मोठा दिलासा दिला आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने 6 डिसेंबरलाही परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण दिलं होतं. तो आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे ज्यामुळे परमबीर सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान परमबीर सिंग यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारनेही प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांच्याविरोधातली प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करावी असेही संकेत दिले आहेत. एवढंच नाही इतर कोणत्या प्रकरणात आता पोलीस चार्जशीट दाखल करणार नाहीत असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
परमबीर सिंग यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की महाराष्ट्र सरकारने परमबीर यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे, त्याचप्रमाणे डीजीपी संजय पांडे यांनीही आपलं उत्तर दिलं आहे. मात्र सीबीआयने याबाबत काहीही म्हटलेलं नाही. वाद-प्रतिवादासाठी आम्ही तयार आहोत.