NSE Scam: ‘योगीं’च्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना CBI ने केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे. को लोकेशन प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन नाकारला. त्यानंतर ही कारवाई सीबीआयने केली आहे. या प्रकरणात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यांना आधीच अटक केली आहे.

सीबीआयने सेबीच्या नुकत्याच्या आलेल्या तपास अहवालानंतर चित्रा रामकृष्ण यांना अटक केली आहे. चित्रा रामकृष्ण या NSE शी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातल्या एका अज्ञात योगीला देत होत्या. त्याच अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणी चित्रा यांची मुंबईतही चौकशी केली आहे. आयटी म्हणजे आयकर विभागानेही मुंबई आणि चेन्नई या ठिकाणी चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती.

चित्रा रामकृष्ण यांचे कथित सल्लागार आणि एनसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांनाही सीबीआयने याआधीच अटक केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार 2010 ते 2015 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. मार्च 2013 पर्यंत रविनारायण हे NSE चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. त्या दरम्यान चित्रा रामकृष्ण या डेप्युटी सीईओ होत्या. त्यांनी एप्रिल 2013 रवि नारायण यांची जागा घेतली, त्याच पदावर त्या डिसेंबर 2016 पर्यंत होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खळबळजनक प्रकरण! एका ‘योगी’च्या मनाप्रमाणे चित्रा रामकृष्ण घ्यायच्या NSE चे निर्णय

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण या हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय होत्या. सेबीने रामकृष्ण आणि इतर अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या अंतिम आदेशात या गोष्टीचा खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांना सीबीआयने केली अटक

चित्रा रामकृष्ण यांनी त्यांच्या कार्यकाळात एका हिमालयातील योगीच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यम यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या सल्लागार पदावर नियुक्त केले होतं, असं सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना मनमर्जीप्रमाणे अनेकवेळा पगारवाढ दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामाच्या मूल्याकंनाचे कोणतेही पुरावे नाहीत, असं सेबीने आदेशात म्हटलं आहे.

चित्रा रामकृष्ण हिमालयातील योगीला शिरोमणी मानायच्या. 20 वर्षांच्या कार्यकाळात व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयासंदर्भात त्या योगीचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायच्या, असंही सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण या 2013 ते 2016 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT