Thane: 'मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून शिंदेंनी ठाकरेंसोबत..', BJP पदाधिकाऱ्याच्या आरोपाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

'शिंदेंनी मुलासाठी ठाणे सोडलं', भाजप पदाधिकाऱ्याचं मोठं विधान
'शिंदेंनी मुलासाठी ठाणे सोडलं', भाजप पदाधिकाऱ्याचं मोठं विधान
social share
google news

Thane Lok Sabha Election 2024: नवी मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. त्यातही सर्वांच लक्ष हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. अखेर काल (1 मे) शिवसेनेने येथे नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर केलं. पण त्यामुळे ठाणे मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट शिंदे-ठाकरेंमध्ये 'डील' झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. (lok sabha election 2024 reconciled in a eknath shinde and uddhav thackeray shinde made a deal in thane constituency for a son bjp office bearer allegation stirs up excitement)

ADVERTISEMENT

ठाणे मतदारसंघ हा भाजपला सुटेल असा येथील भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा होरा होता. त्यासाठी भाजपमधील दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हे तयारीला लागले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्याने संजीव नाईक यांच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं.

हे ही वाचा>> 'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय X% मारली?', राणेंचा तोल सुटला!

यामुळेच नवी मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यंत्र्यांवर गंभीर आरोप केले. 'शिंदें यांनी आपल्या मुलासाठी आणि ठाकरेंसोबत साटंलोटं केलं.' असा आरोप त्यांनी यावेळी केला. याशिवाय नवी मुंबईतील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्केंना तिकीट दिल्याच्या विरोधात आपले राजीनामे दिले आहेत. 

हे वाचलं का?

'शिंदे-ठाकरेंचं साटंलोटं...', भाजपचे पदाधिकारी शिवसेनेवर संतापले

नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्याने आपल्या भावना व्यक्त करताना असं म्हटलं की, '65 नगरसेवक हे 2019 साली गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी देखील विधानसभेच्या वेळेस संजीव नाईक यांनी दहा वर्ष नेतृत्व केलं. तिसरं टर्म असताना देखील त्यांना डावलण्यात आलं आहे. पण संजीव नाईक यांनी मनाचा मोठेपणा दाखवून गणेश नाईक साहेबांना जागा दिली.' 

'आम्ही तो अन्याय सहन केला. परंतु त्या अन्यायला न्याय मिळाला नाही. आम्हाला खात्री होती की, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल.. पण तिथेही त्यांना डावलण्यात आलं. 16 मार्चला आचरसंहिता लागू झाली. पाचव्या टप्प्यासाठी आता अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीने अनेक बैठका होत असताना आम्हाला सांगण्यात आलं की, कोणत्याही परिस्थितीत ठाणे मतदारसंघ हा भाजपला सोडण्यात येईल.' 

ADVERTISEMENT

'भाजपच्या वतीने तिथे एकमेव उमेदवार इच्छुक होते ते म्हणजे संजीव नाईक. बाकी कोणीही इच्छुक नव्हतं. पण काल एक बातमी धडकली आणि नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ''शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंनी मला दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर''

'ठाणे लोकसभा मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपच्या प्रभावाखाली आहेत. नवी मुंबईत साडे आठ लाख मतदार आहेत. मीरा-भाईंदरमध्येही आपण पाहत असाल तर सगळ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला आहे.' 

'तुमच्या दोन आमदारांच्या जीवावर इथे साटंलोटंचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की, आज आम्ही महायुतीतील घटक आहोत. पण कल्याणच्या जागेसाठी त्यांच्या पुत्रासाठी.. श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी जी वाटाघाटी केलीय.. तिथे ठाकरे गटाने किरकोळ उमेदवार दिला आणि साटंलोटं केलं.. तिथे कोणताही प्रचार न करता त्यांचा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के नावाचा कार्यकर्ता.. महापौर जरी असला तरी त्यांच्या वॉर्डच्या बाहेर त्यांचं काही चालत नाही.'

'आज आम्ही एवढंच सांगतोय.. आज महायुतीचं काय व्हायचंय किंवा काय भूमिका घ्यायची ते आमची नेते मंडळी घेतील. आज सकाळी जी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक ही नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये झाली.' 

'इथे नाईक साहेबांनी त्यांची भूमिका विषद केली. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.' 

'नवी मुंबई महापालिका ही गेली 25 वर्ष सातत्याने एक नंबर येत आहे. असं असतानाही त्यांना सलग डावललं जात असल्याची भावना ही आम्हा सगळ्यांची झाली आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, आम्ही कशासाठी नरेश म्हस्केंचा प्रचार करायचा?' असा खडा सवाल त्यांनी विचारला. 

भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा लक्षात घेता नरेश म्हस्के यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच सोप्पी नसेल. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT