नागपूरमध्ये भरधाव SUV ची तीन बाईकना जोरदार धडक, ७० फूट खाली पडून एकाच कुटुंबातले चौघे ठार

मुंबई तक

नागपूरच्या सक्करदरा भागात असलेल्या उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमधल्या या भीषण अपघातात एकाच दुचाकीवर चाललेल्या विनोद खापेकर, त्यांच्या वृद्ध आई लक्ष्मी खापेकर आणि दोन मुलं विवान आणि वेदांत या चौघांचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-अहमदनगर महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूरच्या सक्करदरा भागात असलेल्या उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमधल्या या भीषण अपघातात एकाच दुचाकीवर चाललेल्या विनोद खापेकर, त्यांच्या वृद्ध आई लक्ष्मी खापेकर आणि दोन मुलं विवान आणि वेदांत या चौघांचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

पुणे-अहमदनगर महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातले पाच जण ठार

नेमकी नागपूरमध्ये काय घडली अपघाताची घटना?

शुक्रवारी रात्री १०.१५ च्या सुमारास रेशीम बाग चौकाकडून दिघोरी चौकाकडे जाणाऱ्या महिंद्रा कारचा ताबा सुटला. या कारचा वेग प्रचंड होता. या कारने तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की तीनपैकी दोन दुचाकी या सक्करदरा पुलावरच पडल्या. मात्र तिसरी धडक ज्या दुचाकीला दिली ती जास्त भयंकर होती कारण यामुळे दुचाकी साधारण ७० फूट खाली फेकली गेली.

Accident On Pune Bangalore Highway: नौदल कर्मचाऱ्यासह एकाच कुटुंबातले पाच ठार

हे वाचलं का?

    follow whatsapp