धक्कादायक ! चुगली करुन बदनामी करतो म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून
उल्हासनगरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला मित्र चुगली करुन आपली बदनामी करत असल्याच्या रागातून ही हत्या घडली आहे. राहुल असं मृत तरुणाचं नाव असून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत किरण म्हात्रे या आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरण म्हात्रे आणि राहुल हे दोघंही उल्हासनगर कँप नंबर […]
ADVERTISEMENT
उल्हासनगरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला मित्र चुगली करुन आपली बदनामी करत असल्याच्या रागातून ही हत्या घडली आहे. राहुल असं मृत तरुणाचं नाव असून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत किरण म्हात्रे या आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार किरण म्हात्रे आणि राहुल हे दोघंही उल्हासनगर कँप नंबर ४ मध्ये राहत होते. राहुल हा आपली बाहेर चुगली करुन बदनामी करत असल्याचा संशय किरण म्हात्रेला होता. यातून किरणने राहुलला रविवारी रात्री मराठा सेक्शनमध्ये भेटायला बोलावलं.
यावेळी झालेल्या बाचाबाचीतून किरणने राहुलचं डोकं जमिनीवर आटपून त्याच्यावर मडक्याने वार केले. या हल्ल्यात राहुलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
हे वाचलं का?
पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने एका व्यक्तीचा सपासप वार करून खून
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT