जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
व्यंकटेश दुदुमवार, प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जांबिया) हद्दीत आज 14 जानेवारी 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांबिया) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जांबिया) आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास […]
ADVERTISEMENT

व्यंकटेश दुदुमवार, प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जांबिया) हद्दीत आज 14 जानेवारी 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांबिया) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोस्टे पार्टी गट्टा (जांबिया) आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.
नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे वय 30 वर्षे पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटून क्र. 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य आणि नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता.
‘मिलिंद तेलतुंबडे शहीद’ 27 नक्षली मारले गेल्यानंतर नक्षली संघटनांची पहिली प्रतिक्रिया










