आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेवर गौरी खान पहिल्यांदाच बोलली; म्हणाली…
Gauri Khan on aryan khan Arrest : अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्यावर्षी अटक झाली होती. आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख खान आणि गौरी खानने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या प्रकरणावर आता गौरी खानने पहिल्यांदाच भाष्य केलंय. निमित्त ठरलं करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण शो’! गेल्या […]
ADVERTISEMENT
Gauri Khan on aryan khan Arrest : अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्यावर्षी अटक झाली होती. आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख खान आणि गौरी खानने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या प्रकरणावर आता गौरी खानने पहिल्यांदाच भाष्य केलंय. निमित्त ठरलं करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण शो’!
ADVERTISEMENT
गेल्या वर्षी २०२१ मध्ये मुंबईवरून गोव्याला निघालेल्या क्रूझवर एनसीबीने अर्थात अमली पदार्थ नियंत्रक विभागाने धाड टाकली होती. या कारवाईवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरून अटक करण्यात आली होती.
आर्यन खानला झालेल्या अटकेवरून बराच गदारोळ झाला होता. अनेक दिवस आर्यन खान आणि हे ड्रग्ज प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं होतं. या काळात शाहरुख खान शुटिंग थांबवून भारतात परतला होता. या सर्व काळात मात्र शाहरुख खान किंवा गौरी खाननं कोणतंही भाष्य केलं नव्हतं. आता गौरी खाननं आर्यन खानच्या अटकेनंतरचा अनुभव सांगितलाय.
हे वाचलं का?
आर्यन खानला अटक झाल्यानंतरचा गौरी खानने सांगितला अनुभव
करण जोहरचा शो कॉफी विथ करण ७ च्या नव्या भागात गौरी खानने हजेरी लावलीये. गौरी खानसोबत चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूरही होती.
करण जोहरने गौरी खानला कोणता प्रश्न विचारला?
या शोमध्ये करण जोहरने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख न करता त्याविषयी गौरी खानला प्रश्न विचारला. करण जोहर म्हणाला, ‘हे त्याच्यासाठी खूपच कठीण राहिलं. तुम्ही सगळे या प्रसंगातून अधिक ताकदीने बाहेर निघालात. मला माहितीये तू एक आई आहेस आणि आपण एका कुटुंबाचा भाग आहोत. मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे. हे कुणासाठीही सोप्पं नाहीये. गौरी तू यामुळे अधिक ताकदीने उभी राहिलीयेस’, असं करण जोहर म्हणाला.
ADVERTISEMENT
गौरी खान आर्यन खानच्या अटकेवर काय म्हणाली?
करण जोहरने विचारलेल्या प्रश्नावर गौरी खान म्हणाली, ‘ज्यातून आम्ही गेलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. एक कुटुंब म्हणून जिथे आहोत, मी म्हणेन की आपण एका चांगल्या ठिकाणी आहोत. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आपले मित्र, तसेच खूप सारे लोक ज्यांना आपण ओळखत नाही. त्यांच्याकडून असंख्य मेसेज आले आणि त्यांचं खूप प्रेम मिळालं. यामुळे आम्हाला नशीबवान असल्याचं जाणवतंय. ज्यांनी मदत केली, त्या सर्वांची मी आभारी आहे’, असं गौरी खान म्हणाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT