अंबानींच्या अँटेलियाबाहेर आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयित कार आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याच कारमध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आता नवनवे अपडेट समोर येत आहेत. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे. मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे निवासस्थान हे मुंबईतील पेडर रोड येथे आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. पेडर […]
ADVERTISEMENT
मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयित कार आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याच कारमध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आता नवनवे अपडेट समोर येत आहेत. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे.
मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे निवासस्थान हे मुंबईतील पेडर रोड येथे आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. पेडर रोड भागात मर्सिडिज, ऑडी, रॅण्ड रोव्हर यांसारख्या कार असतात. मात्र या भागात स्कॉर्पियो कार दिसल्याने पोलिसांनी संशय आला. ही कार लगेच तपासण्यात आली. ज्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली आणि त्याचवेळी कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरु केला.
दरम्यान, या कारमध्ये फक्त जिलेटिनच्या कांड्याच सापडल्या होत्या. त्यामध्ये डिटोनेटर किंवा स्फोट घडवून आणणारे इतर साहित्य अद्याप सापडलेलं नाही. त्यामुळे फक्त जिलेटनची कांड्या ठेवणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ही बातमी पाहिलीत का?: अंबानींच्या घराजवळील संशयित कारबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर
पाहा अँटेलियाच्या बाहेर आतापर्यंत काय-काय घडलं!
जिलेटिनच्या कांड्यांसोबत आठ वेगवेगळ्या नंबर प्लेटही सापडल्या!
ADVERTISEMENT
अँटेलियाबाहेर उभी करण्याता आलेली संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्यांसोबत अनेक नंबर प्लेट देखील पोलिसांना मिळाल्या आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही नंबर प्लेट या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या गाड्यांशी मिळत्या-जुळत्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सच्या बॅगमध्ये सापडलं धमकीचं पत्र
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी संपूर्ण प्लॅनिंग केलं गेलं होतं. जे बऱ्याच दिवसांपासून सुरु होतं. आरोपीला ही गाडी अँटेलियाच्या अगदी जवळ उभी करायची होती. पण जास्त सुरक्षा रक्षक असल्याने त्याला तसं काही करता आलं नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबीय आणि त्यांच्या ताफ्यावर देखील आरोपीची नजर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जी स्कॉर्पिओ कार अँटेलियासमोर उभी करण्यात आली होती त्याच कारच्या मागच्या सीटवर मुंबई इंडियन्स नाव असलेली एक बॅग ठेवण्यात आली होती. याच बॅगमध्ये धमकीचं पत्र ठेवण्यात आलं होतं. यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘हा फक्त एक ट्रेलर आहे. नीता भाभी, मुकेश भैया… ही फक्त एक झलक आहे. पुढच्या वेळेस संपूर्ण सामान तुमच्याकडे येईल. त्यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला आहे.’ ज्या व्यक्तीने ही स्कॉर्पिओ कार पार्क केली होती तो नंतर त्या गाडीतून उतरुन दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेला होता.
अधिक वाचा: ‘मुकेश भाई ये तो सिर्फ ट्रेलर, संशयित कारमध्ये सापडलं धमकीचं पत्र!
जिलेटिन कांड्यांचं नागपूर कनेक्शन
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, आरोपीला हेच हवं होतं की, तो सगळ्यांच्या नजरेत यावा. त्याचप्रमाणे हा संपूर्ण प्लॅन आखण्यात आला होता. ज्या कंपनीच्या जिलेटिन कांड्या या गाडीत सापडल्या आहेत ती कंपनी नागपूरमधील आहे. आता मुंबई क्राईम ब्रांचची एक टीम आता नागपूरला जाऊन या प्रकरणाचा तपास करणार आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी मुंबई पोलीस आणि एटीएस याप्रकरणी दहशतवादाच्या अँगलने तपासणी करत आहे.
ADVERTISEMENT