Nitin Gadkari म्हणतात ‘शेतकरी बैलांच्या मागे लागतो तसं..’ सांगितली काम करून घेण्याची पद्धत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन गडकरी म्हणजे दूरदृष्टी असलेला नेता अशी त्यांची ख्याती आहे. रस्ते विकासात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही इतकी धडाडीची कामं त्यांनी देशभरात करून घेतली आहेत. आज ते पुण्यात होते. पुण्यात आल्यावर गडकरी खास शैलीत टोलेबाजी करणार यात काही शंकाच नव्हती. तशी त्यांनी केली आणि आपली काम करण्याची पद्धतही सांगितली ज्यानंतर सभागृहात हशा पिकला.

ADVERTISEMENT

सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या भूमिपूजनासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरींनी खुमासदार पद्धतीने आपली काम करून घेण्याची शैली सांगितली.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

हे वाचलं का?

पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास 1400 कोटींचा आहे. त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. कामं करून घ्यायची असतील तर लक्षात ठेवा, ‘शेतकरी जसा बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिलं, तर त्याचंच काम होतं, बाकीच्यांचं होत नाही.’ त्या वेळी मी सचिवांना या कामाची तातडीनं कंत्राटं काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे 1400 कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झालं आहे.

‘शेतकरी जसा बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिलं, तर त्याचंच काम होतं, बाकीच्यांचं होत नाही.’

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

ADVERTISEMENT

मला आज दोन गोष्टींचा आनंद झाला. ज्यावेळी पुण्यातील मेट्रो चे काम रखडले होते आणि नागपूर मेट्रो चे काम पुढे गेले होते. तेव्हा माझ्यावर, देवेंद्रजींवर टीका झाली. पुण्यातील मेट्रो अंडरग्राऊंड करावी की ओव्हरहेड यावरून काम रखडले होते. आम्ही अंडरग्राऊंड चा पर्याय बाजूला ठेवून कामाला परवानगी दिली. आज मेट्रो चे काम प्रगतीपथावर आहे. याचा आनंद आहे.

गडकरी youtube वरुन महिन्याला चार लाख कसे कमावतात?; काय करावं लागतं?

अजितदादांना विनंती

पुणे विमान तळाच्या विस्तारीकरण चे कामही वेगात सुरू आहे. त्याचाही आनंद आहे. पुण्यातील मुळा मुठा विकास प्रकल्प रखडला होता. मी त्या खात्याचा मंत्री होतो तेव्हा प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन लागलो होतो. ते कामही आता मार्गी लागले आहे. आज उद्घाटन होत असलेला सिंहगड रोडवरील पूल खरतर 18 लेन चा व्हायला पाहिजे. इथे ते शक्य नाही. परंतू नगर रोड वरील वाघोली ले शिरूर रस्ता तीन मजली करणार आहोत. तळेगाव ते नगर रोड हा रस्ताही तसाच बनवणार. त्यासाठी 50 हजार कोटी खर्च करणार. राज्य सरकारकडून पैसे नको. फक्त GST तेवढा माफ करा अशी अजित दादांना विनंती आहे.

आज उद्घाटन होत असलेला सिंहगड रोडवरील पुल खरतर 18 लेन चा व्हायला पाहिजे. इथे ते शक्य नाही. परंतु नगर रोड वरील वाघोली ले शिरूर रस्ता तीन मजली करणार आहोत. तळेगाव ते नगर रोड हा रस्ताही तसाच बनवणार. त्यासाठी 50 हजार कोटी खर्च करणार. राज्य सरकारकडून पैसे नको. फक्त GST तेवढा माफ करा अशी अजित दादांना विनंती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT