कोरोनामुळं भारताला सुवर्णसंधी; चीनला मागे टाकून बनू शकतो ‘फॅक्ट्री ऑफ वर्ल्ड’
कोरोनामुळं चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. या संसर्गामुळे आता चीन ‘फॅक्टरी ऑफ वर्ल्ड’चा ताज गमावण्याची शक्यता बळावली आहे. वास्तविक, कोरोनाच्या भीषण संसर्गामुळे चीनमधील कारखान्यांमध्ये मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत येथे उत्पादन घटू लागले आहे. मात्र ही समस्या केवळ कोरोनामुळे निर्माण झालेली नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे चीनमधील लोकांना कमी वेतनात […]
ADVERTISEMENT

कोरोनामुळं चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. या संसर्गामुळे आता चीन ‘फॅक्टरी ऑफ वर्ल्ड’चा ताज गमावण्याची शक्यता बळावली आहे. वास्तविक, कोरोनाच्या भीषण संसर्गामुळे चीनमधील कारखान्यांमध्ये मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत येथे उत्पादन घटू लागले आहे. मात्र ही समस्या केवळ कोरोनामुळे निर्माण झालेली नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे चीनमधील लोकांना कमी वेतनात धोकादायक कारखान्यात काम करायचे नाही. विशेषत: तरुणांना चीनमधील कारखान्यांमध्ये कमी पगारावर काम करायचे नाही आणि सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा परिणाम चिनी कारखान्यांवरही होत असून त्यामुळे कारखान्यांमधील उत्पादन घटले आहे.
भारत बनणार फॅक्टरी ऑफ वर्ल्ड?
अशा परिस्थितीत चीनच्या या सध्याच्या आणि आगामी समस्येचा भारत फायदा घेऊ शकतो. भारत ज्याप्रकारे महागाईसह सर्व प्रकारच्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे, ते सोडवण्यासाठी भारताला जागतिक फॅक्ट्री बनण्याचा विचार करावा लागेल. यावर उपाय म्हणून भारताला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. यासाठी उत्पादन हा एक उत्तम पर्याय आहे कारण तो अकुशल कामगारांपासून कुशल कामगारांपर्यंत सर्वांना संधी देतो.
पुरवठा साखळी बनवणाऱ्या देशाला अमेरिका मदत करेल
अलीकडेच ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे 14 सदस्यीय इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कची बैठक झाली. जगाने उत्पादनासाठी चीनचा पर्याय शोधला पाहिजे, यावर भर देण्यात आला. या मंचाच्या चार स्तंभांपैकी एक म्हणून पुरवठा साखळीला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. चीनची जागा घेण्यास तयार असलेल्या सक्षम देशांमध्ये गुंतवणूक करण्यात अमेरिकेने स्वारस्य दाखवले आहे.
स्वस्त कामगारांच्या जोरावर जागतिक कारखाना उभारणार!
अशा परिस्थितीत हा प्रयत्न यशस्वी करण्याची ताकद भारताची मोठी श्रमशक्ती आणि कमी वेतनदर यांच्यात आहे. सध्या चिनी कारखान्यांमधली सर्वात मोठी समस्या स्वस्त मजुरांची आहे, ज्याचा फायदा भारत घेऊ शकतो. चीनच्या तुलनेत कमी दरात भारतात मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती उपलब्ध आहे. चीनच्या तुलनेत भारताला उत्पादनाच्या दृष्टीने पर्याय म्हणून विकसित करावे लागेल. कच्च्या मालासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत.