Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर, एटीएसने मुंबईतील शिक्षकाला उचललं! घरात देशविरोधी बैठका व्हायच्या अन्...

मुंबई तक

चौकशीच्या संदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकाच्या घरात देशविरोधी बैठका व्हायच्या.

ADVERTISEMENT

एटीएसने मुंबईतील शिक्षकाला उचललं!
एटीएसने मुंबईतील शिक्षकाला उचललं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्ली स्फोटानंतर, एटीएसने मुंबईतील शिक्षकाला उचललं!

point

घरात देशविरोधी बैठका व्हायच्या अन्...

Delhi Blast: काही दिवसांपूर्वी, पुण्यातील झुबेर हंगरगेकर (37) नावाच्या सॉफ्टवेअर इंजीनिअरला अल-कायदा आणि इतर बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता, याच चौकशीच्या संदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एका शिक्षकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हंगरगेकर संबंधित शिक्षकाच्या घरात काही लोकांसोबत देश-विरोधी बैठका करायचा.

कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न   

एटीएस (ATS) कडून हंगरगेकरला 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी झुबेर धार्मिक प्रवचनांद्वारे कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात उघडीस आलं होतं. एटीएसने तपास केला असता झुबेरच्या जुन्या मोबाईल फोनमध्ये पाकिस्तानी संपर्क फोन नंबरसह बरेच आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांक सापडले आहेत. यामध्ये, सौदी अरेबियातील दोन, कुवेतमधील एक आणि ओमानमधील एक मोबाईल क्रमांक समाविष्ट आहे.

हे ही वाचा: पुण्यात खळबळ! इंदापुरात आढळला पुरुषाच्या पायाचा गुडघ्यापासून तोडलेला भाग... पोलीसही चक्रावले

हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये काय सापडलं? 

सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसला तपासादरम्यान हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये 'अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' शी संबंधित डिलीट केलेल्या पीडीएफ फाइल्स, ओसामा बिन लादेनच्या भाषणाचा उर्दू अनुवाद आणि 'इन्स्पायर' नावाचं मासिक सापडलं. 'इन्स्पायर' मासिकमध्ये हत्यारांचं प्रशिक्षण आणि आयईडी बनवण्याशी संबंधित साहित्य आढळलं. आता, मुंब्रा येथे राहणाऱ्या शिक्षकाची चौकशी केली जात असून तपासादरम्यान त्याचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही, तसेच त्याचा आरोपी किंवा त्याच्या सहकाऱ्यांशी कोणताही संबंध असल्याचंही आढळून आलेले नाही. मात्र, तरी सुद्धा संबंधित प्रकरणासंदर्भात एटीएसचा तपास सुरूच आहे. 

हे ही वाचा: वहिनीच्या प्रेमात पडला अन् दोघांनी केलं लग्न! आईच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर गावी आला, नंतर घडला भयंकर प्रकार...

एटीएसचा तपास 

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगरगेकरने कोणकोणत्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न केला? याचा तपास एजन्सी शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. पथकाने आरोपीची डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासासाठी सायबर प्रयोगशाळेत पाठवली आहेत. यासोबतच, आर्थिक देवाण-घेवाण आणि झुबेरच्या परदेशी लोकांसोबत असलेल्या संपर्कांचा देखील खोल तपास केला जात आहे. आरोपीला आंतरराष्ट्रीय संघटनांकडून कोणती आर्थिक मदत मिळाली आहे का? याचा शोध घेण्यासाठी एटीएस तपास करत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp