तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार! आरोपींनी 24 तासांनंतर गावी आणून सोडलं अन्...
एका तरुणीला किडनॅप करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती आहे. गावातील चार नराधमांनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार!
आरोपींनी 24 तासांनंतर पीडितेला गावी आणून सोडलं अन्...
Crime News: बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीला किडनॅप करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती आहे. गावातील चार नराधमांनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपींनी तिला 24 तासांनंतर तिच्या गावी आणून सोडलं. या प्रकरणबाबात पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये एफआरआय दाखल केली असून यामध्ये चार आरोपी तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींच्या शोधासाठी छापे...
संबंधित घटनेची तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत गायघाट पोलीस स्टेशन हद्दीतील बाघाखाल गावात राहणाऱ्या जितेंद्र कुमार नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तसेच, इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस छापे टाकत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, "माझ्या मुलीचं त्याच गावातील दोन आणि बाघाखाल गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी अपहरण केलं.
हे ही वाचा: Delhi Blast: डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध! पतीपासून घेतला घटस्फोट, डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...
पीडितेच्या वडिलांनी केली तक्रार
त्या नराधमांनी मुलीचं अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळताच आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तिच्याबद्दल आम्हाला काहीच कळालं नाही." तसेच, पुढे ते म्हणाले की, आरोपी तरुणांनी पीडितेला अपहरण करून तिला 24 तासांनंतर पुन्हा तिच्या गावात आणून सोडलं. घरी परतल्यानंतर, पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबद्दल तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: सांगली हादरली! वाढदिवसादिवशीच दलित महासंघाच्या नेत्याला संपवलं, जमावाच्या मारहाणीत खून करणाऱ्याचा मृत्यू!
पोलिसांचा तपास
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्याविरुद्ध कारवाई सुद्धा सुरू झाली आहे. घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत. आता प्रकरणाचा सर्व बाजूंनी विचार केला जात असून पोलीस याबाबत पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.










